'टोल नाक्‍यांच्या माध्यमातून करोडो रुपयांचा गैरव्यवहार' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

पुणे : ''सामान्य माणूस प्रवासात टोल भरतो, त्या वेळी त्याला क्षणभर वाईट वाटते. मात्र, नंतर त्या गोष्टीचा विचार करत नाही. या टोल नाक्‍यांच्या माध्यमातून करोडो रुपयांचा गैरव्यवहार होतो. या संदर्भात विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे,'' असे मत टोल नाक्‍यांचे अभ्यासक संजय शिरोडकर यांनी मांडले. 

शिवापूर टोल नाका विरोधी कृती समितीने आयोजिलेल्या सभेत ते बोलत होते. या वेळी राष्ट्रशक्ती संघटना, संभाजी ब्रिगेड, भोर-वेल्हा नागरी कृती समिती, मावळा जवान संघटना, राजगड शेतकरी बचाव कृती समिती, इव्हेस्टर वेल्फेअर फोरम आदी संघटना उपस्थित होत्या.

शिरोडकर म्हणाले, ''शिवापूर टोल नाक्‍यावर सर्व नियम व अटींची पायमल्ली होताना दिसते. त्यामुळे सरकारने हा टोल नाका त्वरित बंद करावा.'' समितीचे ज्ञानेश्‍वर दारवटकर यांनी प्रास्ताविक केले. शहाजी आडसूळ यांनी सूत्रसंचालन केले.