सौरऊर्जेने महाविद्यालये होणार 'स्वयंप्रकाशित' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

सौरऊर्जा प्रकल्पातून महाविद्यालयांना त्यांच्या गरजेपुरती वीज मिळणार असल्याने विजेचा वापर कमी होऊन विजेची बचत होण्यास हातभार लागेल. तसेच या प्रकल्पामुळे महाविद्यालयांच्या वीजखर्चात बचत होईल. 
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आता 'स्वयंप्रकाशित' होणार आहेत. विद्यापीठाकडून मिळणाऱ्या निधीतून या महाविद्यालयांमध्ये दहा किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प साकारणार आहे. यातून महाविद्यालयास पुरेशी वीज मिळू शकणार असल्याने त्यांच्या विजेच्या खर्चात बचत होणार आहे. 

विद्यापीठाने गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत महाविद्यालयांना सौरऊर्जा प्रकल्पांसाठी प्रत्येकी पाच लाख रुपये निधी देऊ केला आहे. यामध्ये महाविद्यालयांनी दीड लाख रुपयांची भरू घालून प्रकल्प उभारायचा आहे. यातून दररोज 50 युनिट वीजनिर्मिती होणार आहे. ज्या महाविद्यालयांना महिन्याला दीड हजार युनिट विजेची गरज असते, ती या प्रकल्पामुळे पूर्णत: भागविली जाणार आहे. 

याबद्दल विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. श्रीरंग बाठे म्हणाले, ''विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 228 महाविद्यालयांनी या प्रकल्पासाठी अर्ज केले आहेत. त्यासाठी 111 महाविद्यालयांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. प्रकल्पासाठी महाविद्यालयाकडे छतावर पुरेशी जागा उपलब्ध असणे गरजे आहे. त्या जागेची पाहणी सुरवातीला केली जाते. त्यानंतर प्रस्ताव मंजूर केला जातो. मंजुरीसाठी संबंधित महाविद्यालयाकडे पूर्णवेळ पात्र प्राचार्य असणे आवश्‍यक असते.'' 

''सौरऊर्जा प्रकल्पामुळे महाविद्यालयांची विजेची गरज पूर्ण होऊन वीज खर्चात बचत होईलच. परंतु गरजेपेक्षा अधिक वीज तयार होत असल्यास त्याची विक्री वीज कंपनीला करता येणार आहे. यामुळे महाविद्यालयांना आर्थिक फायदाही होऊ शकेल. या प्रकल्पासाठी महाविद्यालयांना दीड लाख रुपये गुंतवावे लागणार असले, तरी प्रकल्पाच्या एकूण किमतीवर त्यांना 'महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी'कडून (मेडा) 30 टक्के अनुदान मिळणार आहे. म्हणजेच त्यांना हा प्रकल्प पूर्णत: मोफत उपलब्ध होऊ शकेल.''

पुणे

पुणे : "मुस्लिमधर्मीय पुरुष कायद्याचा उपयोग स्वतःच्या सुखप्राप्तीसाठी करत असताना...

11.12 AM

मंचर : वाळद (ता. खेड) येथे सायली निलेश शिंदे (वय ७) या मुलीला घरात खेळत असताना सोमवारी (ता.१८) संध्याकाळी पाच वाजता सर्पदंश झाला...

08.54 AM

खडकवासला : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी दिवसभर धो धो पाऊस पडल्याने खडकवासला, पानशेत व वरसगाव हो तिन्ही धरणे 100 टक्के भरली...

08.48 AM