'बाप्पाग्राफी'मध्ये पाहा गणेशोत्सवातील विविध रंग 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

पुणे : गणेशोत्सवाची धामधूम...त्याच्या तयारीसाठीची लगबग...उत्सवादरम्यानचे काही क्षण...विसर्जन मिरवणुकीतील काही अविस्मरणीय घटना, देखावे, अनुभव छायाचित्रांद्वारे पुन्हा अनुभविण्याची एक अनोखी संधी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे. निमित्त आहे 'बाप्पाग्राफी' छायाचित्र प्रदर्शनाचे. 

ड्रीम्स टू रिऍलिटी आणि वाइड विंग्सतर्फे आयोजित या प्रदर्शनाचे उद्‌घाटन चित्रकार मिलिंद मुळीक यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. संयोजक कुशल खोत हे उपस्थित होते. 

याबाबत खोत म्हणाले,'' प्रदर्शनाचे हे सहावे वर्ष आहे. 'गणेश उत्सव' अशी संकल्पना घेऊन आम्ही छायाचित्र स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेमध्ये सुमारे 140 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. केवळ पुण्यातूनच नव्हे तर राज्यभरातून आणि विदेशातून काही जण यामध्ये सहभागी झाले होते. त्यापैकी निवडक 70 स्पर्धकांची छायाचित्रे या प्रदर्शनामध्ये सादर करण्यात आली आहेत. 

या प्रदर्शनामध्ये गणेशोत्सवाची पूर्वतयारी, उत्सवादरम्यानचे काही विलोभनीय क्षण तसेच विसर्जन मिरवणुकीतील काही मनमोहक दृश्‍ये पाहायला मिळतील. हे प्रदर्शन रविवारपर्यंत (ता.17) घोले रस्ता येथील राजा रवी वर्मा कलादालन येथे सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत खुले राहील.