''गुजरात निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळेल''

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

पुणे : ''केंद्र आणि राज्य सरकारची कार्यपद्धती, जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर निर्माण झालेला असंतोष गुजरातमधील मतदार मताद्वारे व्यक्त करेल. गुजरातमधील निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळेल,'' असा विश्‍वास लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांनी येथे व्यक्त केला. 

पुणे श्रमिक पत्रकार संघाला त्यांनी सदिच्छा भेट दिली, या वेळी पत्रकारांशी त्या बोलत होत्या. पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र बडदे यांनी त्यांचे स्वागत केले. संघाचे उपाध्यक्ष हेमंत जाधव, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार आदी या वेळी उपस्थित होते.

''केंद्र आणि राज्य सरकारविषयी नागरिकांच्या मनात असंतोष आहे. गुजरातमध्ये पाटीदार आणि पटेल या समाजांकडे सत्ताधारी भाजपने दुर्लक्ष केले आहे. हार्दिक पटेल यांच्यावर झालेली कारवाई चुकीची आहे. एक समाज विरोधात गेल्याने त्याचे नेतृत्व करणाऱ्याला अशी वागणूक देणे योग्य नाही. याची दखल त्यांचा समाज नक्कीच घेईल.'' 

जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर देशात सर्वांत प्रथम गुजरातमधील व्यापाऱ्यांनी आंदोलन केले, याचा उल्लेख करीत त्या म्हणाल्या, ''अहमदाबाद, सुरत येथे हिरे आणि कापड व्यापाऱ्यांनी आंदोलन केले. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली तेथे काँग्रेस निवडणूक लढवीत आहे. काँग्रेसच्या परंपरेनुसारच, नियमात बसेल अशा पद्धतीनेच ही निवडणूक लढविली जाईल.'' 

सोशल मीडियावर सरकारविरोधात भावना व्यक्त होत आहे, त्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधाऱ्यांची भूमिका चुकीची आहे, असेही त्यांनी नमूद केले. प्रसारमाध्यमांना स्वातंत्र्य हवेच. प्रसारमाध्यमांना विरोध म्हणजे लोकशाहीलाच विरोध केल्यासारखे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.