ब्रिटिश लायब्ररीचा 'श्रीगणेशा' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

पुणे : अनेक पिढ्यांना इंग्रजी साहित्याची ओळख करून देणाऱ्या 'ब्रिटिश लायब्ररी'चे नाव उच्चारले, की आपल्यासमोर प्रथम फर्ग्युसन रस्त्यावरील लायब्ररीची दिमाखदार वास्तू येते; पण ही ओळख आता बदलली असून 'ब्रिटिश लायब्ररी' शिवाजीनगरमधील 'रामसुख हाउस'मध्ये स्थलांतरित झाली आहे. येथे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून ही लायब्ररी उद्यापासून (ता. 3) वाचकांसाठी खुली होत आहे. 

सुभाषचंद्र बोस चौकाजवळ असलेल्या 'रामसुख हाउस'च्या तिसऱ्या मजल्यावर ब्रिटिश लायब्ररी सुरू होत आहे. नवी जागा फर्ग्युसन रस्त्यावरील जागेपेक्षा अधिक क्षमतेची आहे. त्यामुळे वाचकांना लायब्ररीत बसून पुस्तके वाचता येऊ शकतील. याशिवाय, वेगवेगळ्या अत्याधुनिक सुविधाही पुरविण्यात आल्या आहेत. त्यामुळे नव्या स्वरूपातील लायब्ररीबाबत वाचकांमध्ये उत्सुकता आहे. या लायब्ररीचे उद्‌घाटन राज्य सरकारचे मुख्य सचिव सुमीत मलिक यांच्या हस्ते उद्या (ता. 3) दुपारी बारा वाजता होणार आहे. 

फर्ग्युसन रस्त्यावर 1960 मध्ये 'ब्रिटिश लायब्ररी' सुरू झाली. असंख्य वाचकांचे बौद्धिक भरणपोषण करण्याचे काम या लायब्ररीने केले. विद्यार्थीच नव्हे, तर वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरही लायब्ररीत पाहायला मिळायचे. लायब्ररीने आजवर वाचनसंस्कृती रुजविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले. वेगवेगळ्या ठिकाणच्या लेखकांचा वाचकांसोबत संवादही घडवून आणला. त्यामुळे सांस्कृतिक क्षेत्रात 'ब्रिटिश लायब्ररी'चे वेगळे महत्त्व आहे. शिवाय, यामुळे फर्ग्युसन रस्त्यालाही वेगळी ओळख प्राप्त झाली; पण इथे असलेली लायब्ररी 29 मे 2017 रोजी बंद करण्यात आली. येथील ग्रंथांबरोबरच नवीन ग्रंथ आता नव्या वास्तूत पाहायला मिळतील, अशी माहिती ग्रंथालयातील सूत्रांनी दिली.

Web Title: marathi news marathi websites Pune British Library