मेरे देश की धरती... 

Annu Kapoor
Annu Kapoor

पुणे : महानायक अमिताभ बच्चन शूटिंगदरम्यान बंगळूरमध्ये झालेल्या अपघातात जखमी झाले होते. त्यातून ते सुखरूपपणे बाहेर पडावेत, यासाठी अरविंद पंड्या यांनी बडोदा ते मुंबईतील सिद्धिविनायकदरम्यानचा उलट्या दिशेने केलेल्या पायी प्रवासानंतर अमिताभ यांनी पंड्यांचे केलेले चरणस्पर्श, ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचा मित्र ताज मोहम्मद यांनी चित्रपटसृष्टीविषयी काढलेले अनुद्‌गार आणि त्यानंतर काही वर्षांतच त्यांचा मुलगा शाहरुख खानचे चित्रपटसृष्टीत झालेले पदार्पण, असे अनेक रंगतदार किस्से सांगत होते अभिनेते अन्नू कपूर. 

निमित्त होते 'सनराईज ऍडव्हटाईजिंग ऍण्ड इव्हेंट'तर्फे आयोजित केलेल्या 'ऍन इव्हिनिंग वुईथ अन्नू कपूर' या कार्यक्रमाचे. 'सकाळ माध्यम समूह' या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे. एव्हरग्रीन गाणी आणि बॉलिवूडमधील अनेक रंगतदार किस्से ऐकण्यासाठी या वेळी नागरिकांनी गर्दी केली होती. 

अन्नू कपूर यांनी बॉलिवूडमधल्या दिग्गजांच्या आठवणींना उजळा देत 'ब्लॅक ऍण्ड व्हाइट' जमान्याचा प्रवास रसिकांसमोर उलगडला. कधी शब्दांची गुंफण, तर कधी सुरेल गाण्यांतून, त्यांनी अनेक रंजक प्रेमकहान्या व बॉलिवूडचे रंगतदार किस्से प्रेक्षकांसमोर मांडले. 

'मेरे देश की धरती, सोना उगले उगले हिरे मोती', 'चंदा को किरणो मैं लिपटी हवा', 'मेरा दिल भी कितना पागल है, यह प्यार तो तुमसे करता है' या गाण्यांपासून सध्याच्या काळातील 'दिल में मेरे है दर्द डिस्को' यासारखी गाणी सादर करून अन्नू कपूर यांनी पुणेकरांची सायंकाळ अविस्मरणीय केली. महान संगीतकार सी. रामचंद्रन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, शंकर-जयकिसन, कल्याणजी-आनंदजी, मदनमोहन यांनी संगीतबद्ध केलेली गाणी सादर करून जुन्या गाण्यांना उजाळा दिला; तसेच कलाकारांनी संगीतातील विविध ताल, राग सादर केल्याने 1950पासून आतापर्यंत संगीत क्षेत्रात झालेले बदल उपस्थितांनी अनुभवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com