अजित पवारांच्या काटेवाडीत सरपंच पदासाठी पंचरंगी लढत

अजित पवारांच्या काटेवाडीत सरपंच पदासाठी पंचरंगी लढत

शिर्सुफळ : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती तालुक्यातील काटेवाडी व भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांच्या पारवडी गावातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी प्रत्येकी पाच उमेदवार निवडणुक रिंगणात कायम राहिले. यामुळे दोघांच्याही गावांमध्ये बहुरंगी लढत रंगणार आहे. तर तालुक्यातील सोळा ग्रामपंचायतीपैकी सायंबाचीवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासह सदस्यांच्या सर्व सात जागा बिनविरोध निवडुन आल्या आहेत.

तालुक्यातील इतर 15 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 52 उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले आहेत. तर सदस्य पदांसाठी 165 पैकी 34 जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 131 सदस्यांच्या साठी 286 उमेदवारी निवडणुक रिंगणात कायम राहिले आहेत.

यामध्ये सायंबाचीवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी एक व  सदस्य पदाच्या सात जागांसाठी सातच अर्ज दाखल झाले तर इतर ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या 34 जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने सदर सदस्यांची बिनविरोध निवडीची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.

गुरुवार (ता.14) अर्ज माघारीचा दिवस असल्याने दिवसभर तहसिल कार्यालयाला जत्रेच स्वरुप आले होते. माघारी प्रक्रियेनंतर दुपारी चिन्ह वाटप करण्यात आले. यामुळे संबंधित गावांमध्ये राजकिय रणधुमाळीला सुरवात झाली आहे.मातब्बरांना आपल्या ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात अपयश आले. यामुळे त्यांना आपली सत्ता राखण्यासाठी झगडावे लागणार आहे.

यामध्ये अजित पवार यांच्या काटेवाडीमध्ये सरपंच पदासाठी 5 तर सदस्यांच्या 15 जांगासाठी 32 उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले आहेत. बाळासाहेब गावडे यांच्या पारवडी गावामध्येही सरपंच पदासाठी 5 व सदस्य पदाच्या 13 जागांसाठी 28 उमेदवार कायम राहिले आहेत. सायंबाची वाडी गावच्या सरपंच पदी कांबळे सुमन सुरेश तर सदस्य पदी भापकर शितल नारायण, भहगत हनुमंत किसन, गावडे काजल अनिल, जगताप प्रमोद दिलीपराव, भापकर चंदुबाई नरहरी, भापकर शारदा शांताराम, भापकर गणेश विश्वास यांची बिनविरोध निवड झाली आहे.

इतर ग्रामपंचायतींच्या बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांमध्ये डोर्लेवाडी भोपळे अलका दिगंबर, निंबाळकर बंजारी भिमराव, बनकर रामभाऊ संभाजी, खोत सुनिता पोपट, नाळे संतोष मनोहर, काळोखे दत्तात्रय जगन्नाथ, भोपळे साधना दिपक (सात जागा), धुमाळवाडी कोकरे रविंद्र तुकाराम, कोकरे निता राजेंद्र, निंबाळकर वैभव आप्पासो (तिन जागा), करंजेपुल गायकवाड निलेश विठ्ठल, मुलाणी लतिफ गफ्फुर, गायकवाड सुनिता गणेश ,गायकवाड सारिका नानासो, लडके सविता जयराम, गायकवाड निलम प्रमोद, गायकवाड अजित आप्पासाहेब (सात जागा), गुणवडी फाळके मनिषा संजय (एक जागा), गाडीखेल चव्हाण शकुंतला बाळु, धायतोंडे संगिता बापुराव, दळवी अनिल आप्पासो, गाढवे राणी दत्तात्रय, दळवी लताबाई मधुकर (पाच जागा), मुढाळे  जानकर निता पोपट, ठोंबरे संपत तात्याबा, ठोंबरे फुलाबाई मल्हारी, मुजावर काजल मुन्ना, ठोंबरे भागुजी किसन (पाच जागा), चौधरवाडी शिंदे शोभा हेमंत, दगडे पांडुरंग नाथ्याबा, दगडे अनिता लालासो, भापकर माधुरी भानुदास, भापकर वैशाली सुधीर, भापकर प्रदिप बाजीराव (सहा जागा) यांचा समावेश आहे. 

चौकट - बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतीचे नाव, सरपंच पदासाठी अंतिम उमेदवार संख्या, निवडणुक लागलेली सदस्य संख्या व उमेदवार संख्या

1) काटेवाडी - 5 - (15 - 32)
2) डोर्लेवाडी - 4 - (8 - 18 )
3) पारवडी - 5 - (13 - 28)
4) कऱ्हावागज - 3 - (11 - 22)  
5) धुमाळवाडी - 2 - (6 -13)
6) करंजेपुल - 4 - (4 - 8)
7) आंबी ब्रु. - 2  - (7 - 14)
8) गुणवडी - 2 - (16 - 39)
9) गाडीखेल - 5 - (2 - 4 )
10) पवईमाळ - 3 - (9 - 21)
11) मान्नापावाडी - 2 - (11 - 22) 
12) सि. निंबोडी - 2 - (9 - 20)
13) मुढाळे - 7 - (8 - 20)
14) चौधरवाडी - 3 - (1 - 2)
15) मेडद - 3 - (11 - 23)

एकूण - 52 - (131- 286)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com