कदमवाक वस्ती ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी चार उमेदवार रिंगणात

कदमवाक वस्ती ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी चार उमेदवार रिंगणात

लोणी काळभोर : पूर्व हवेलीतील राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून सत्ताधारी राष्ट्रवादी कॉग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारात काट्याची लढत होणार असल्याची चिन्हे आहे.

सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असलेल्या सरपंचपदासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष व विद्यमान सरपंच नंदकुमार काळभोर यांच्या पत्नी मनिषा तर भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांच्या पत्नी व माजी पंचायत समिती सदस्या गौरी गायकवाड सरपंचपदासाठी एकमेकासमोर उभ्या ठाकल्या आहेत.

तर वरील दोन्ही नेत्यांच्या विरोधात कदमवाकवस्तीचे माजी उपसरपंच देवीदास काळभोर यांनी आपली पत्नी सुनंदा काळभोर यांना रिंगणात उतरवले आहे. तर या तिघांच्यासह सुजाता रायगोंडा गायकवाड यांनीही आपली उमेदवारी ठेवली आहे.

सतरा जागांच्यासाठी नंदु काळभोर यांनी लोकसेवा पॅनेलच्या माध्यमातून सतरा उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. चित्तरंजन गायकवाड यांनी परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून सतरा जागी उमेदवार उभे केले आहेत. माजी उपसरपंच देविदास काळभोर यांनीही काही ठिकाणी उमेदवार दिले आहेत. मागील पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांना मोठ्या प्रमाणात पैसाचे वाटप झाल्याची कवित्व अजून चर्चिले जात असतानाच, एेन दिवाळीत निवडणूक होणार असल्याने मतदार राजा कसा प्रतिसाद देतो यावर विजयाची गणिते ठरणार आहेत. 

कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीत सतरा सदस्य असून, सध्या नंदू काळभोर यांच्या ताब्यात ग्रामपंचायत आहे. यंदा प्रथमच सरपंचपदासाठी थेट मतदान होणार आहे. नंदू काळभोर यांनी ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात पुन्हा ठेवण्यासाठी कंबर कसली आहे.

सरपंचपदासाठी मनिषा काळभोर यांना रिंगणात उतरवले आहे. तर दुसरीकडे ग्रामपंचायतीची सत्ता खेचण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांनी मागिल सहा महिन्यांपासून फिल्डींग लावली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडकीत गौरी गायकवाड यांना अपयश आले असले तरी, गैरी गायकवाड यांनी सरपंच पद डोळ्यासमोर ठेऊन मतदारांना भेटण्याचा सपाटा लावला होता.

सतरा जागांच्या एकूण उमेदवार 44 निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

प्रभागनिहाय उमेदवार पुढील प्रमाणे (कंसात पॅनेलचे नाव) 
प्रभाग क्रमांक 1 :
 आरती सुशील काळभोर, अर्चना हेमंत टिळेकर, राकेश आगतराव लोंढे (लोकसेवा पॅनेल), वैजंता अनिल कदम, सविता नवनाथ साळुंके, सचिन भागवत दाभाडे, (परीवर्तन पॅनेल) 
प्रभाग क्रमांक 2 : अमित अविनाश काळभोर, राजश्री उदय काळभोर (परीवर्तन पॅनेवल), बाबासाहेब बाळासाहेब काळभोर, वर्षा प्रसाद काळभोर (लोकसेवा पॅनेल), स्मिता निलेश काळभोर, नुतन वसंत काळभोर.
प्रभाग क्रमांक 3 : ऋषिकेश विद्याधर काळभोर, रमेश हरिभाऊ कोतवाल, नासिरखान मुनुलाखन पठाण (परीवर्तण प्रनेल), अनिल शिवाजी काळभोर, पांडुरंग ज्ञानेश्वर काळभोर, विक्रांत संजय ठोंबरे (लोकसेवा प्रनेल), गणेश संभाजी कुंजीर, सचिन राजन पिल्ले.
प्रभाग क्रमांक 4 : मंदाकिनी सुर्यकांत नामुगडे, अशोक कृष्णा शिंदे, नलिमा कलंदर पठाण (परीवर्तण पॅनेल), शरीफ मिरवाज खान, छाया नागसेन ओव्हाळ, वंदना सचिन काळभोर (लोकसेवा पॅनेल), अभिजित रामदास बडदे, 
प्रभाग क्रमांक 5 : नितेश अंबादास लोखंडे, राणी विजय बडदे, अमृता मयूर कदम (परीवर्तण पॅनेल) नागेश सोपान जेटीथोर, सारिका मोहन भोसले, आशा संजय खैरे (लोकसेवा पॅनेल), विद्याधर श्रीमंत बहुरंगी, रामगोंडा यलप्पा गायकवाड, 
प्रभाग क्रमांक 6 : माधुरी चंद्रकांत काळभोर, रुपाली अविनाश कोरे, बाळसाहेब सोपान कदम (परीवर्तण पॅनेल),  सुमन अरुण चौघुले, द्वारकाबाई गंगाराम शिरवाळे,  दिपक बाबुराव काळभोर (लोकसेवा) सुरेखा गिरीष खोपडे. रणधीर विनायक घोरपडे, लक्ष्मी दिपक मोरे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com