जुन्नर ग्रामपंचायतीची बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम

दत्ता म्हसकर
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

जुन्नर : नव्यानेच सरपंच थेट जनतेतून निवडून येणार असल्याने सरपंच पदासाठी गावागावांतून मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी होत असताना जुन्नर तालुक्यातील काले गावाने मात्र आपली बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम ठेवत ग्रामस्थांच्या एकविचारातून बिनविरोध सरपंच व सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

राजकारण व निवडणुकांमुळे गावात गट तट निर्माण होऊन गावाच्या विकासाला खीळ बसते. त्यामुळे गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ व तरुणांनी एकविचाराने गावाच्या विकासासाठी बिनविरोध निवडणुकीचा निर्णय घेऊन इतरांना आदर्श घालून दिला आहे.

काले ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी मालिता मारुती नायकोडी यांची गावाने सरपंच पदी बिनविरोध निवड केली. तर सदस्यपदी जनार्धन पानसरे, अनिता मिननाथ पानसरे, योगिता अमित कर्पे, सविता लक्ष्मण चतुर, रावजी शंकर काळे, साईनाथ विठ्ठल भालेकर यांची निवड करण्यात आली.

जुन्नर तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरू असून अर्ज माघारीच्या आजचा शेवटचा दिवस होता. काले ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाला तर सदस्य पदासाठी सात जागांसाठी सहा अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली.

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर गावातील ज्येष्ठ नागरिक व युवकांच्या उपस्थितीमध्ये गावबैठक घेण्यात आली. या बैठकीस काले गावठाण, गोळेवाडी व बाळोबाची वाडी आदीमधील जवळपास दीडशेहून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी गावात एकोप्याचे वातावरण अबाधित ठेवून काम करण्यासाठी बिनविरोध निवडणुकीचे आवाहन केले. या आवाहनास उपस्थित ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत निवडणूक बिनविरोध करण्याचे जाहीर केले.

त्यानुसार गावाने सरपंच व सदस्य पदाच्या उमेदवारांची नावे जाहीर केली व त्यास सर्व उपस्थितांनी अनुमोदन दिले. काले ग्रामपंचायतींच्या स्थापनेपासून आजपर्यंत गावामध्ये ग्रामपंचायत अथवा विकास सोसायटी यांची निवडणूक झाली नाही. हीच परंपरा यावेळेसही टिकून राहिल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

निवडणूक बिनविरोध करण्यामध्ये माजी सरपंच रवींद्र पानसरे, सरपंच शालिनी पानसरे, उपसरपंच संजय कुमकर, तंटामुक्ती अध्यक्ष नारायण पानसरे, विलास पानसरे, लक्ष्मण पानसरे, मिननाथ पानसरे, जगन चतुर, अशोक नायकोडी, मनोहर पानसरे, बबन पानसरे, सुनील पानसरे, अशोक चतुर, मनोहर घोगरे, शिवाजी कर्पे, कुलदीप नायकोडी, अविनाश पानसरे, शशिकांत पानसरे, विशाल पानसरे , कोंडाजी भालेकर, दिनकर नायकोडी, तान्हाजी पानसरे, नवनाथ पानसरे , सुनील सोनवणे यांसह ग्रामस्थानी प्रयत्न केले.

Web Title: marathi news marathi websites Pune News Junnar News