तातडीच्या उपचारांमुळे वाचले बालकाचे प्राण 

तातडीच्या उपचारांमुळे वाचले बालकाचे प्राण 

जुन्नर : सावरगाव ता. जुन्नर येथे घराबाहेर खेळत असलेल्या पांडुरंग प्रकाश केवळ या १० वर्षाच्या शाळकरी मुलास विषारी साप चावल्यामुळे त्याचे नातेवाईक प्राथमिक आरोग्य केंद्र, सावरगांव ता. जुन्नर येथे घेऊन आले. त्या बालकाला दवाखान्यात आणण्यात २० ते २५ मिनीटे लागली. पण तो साप कोणत्या प्रकारचा होता हे समजण्यास मार्ग नव्हता.

त्या मुलाची तपासणी करुन डॉ. भोर व त्यांच्या स्टाफने त्याच्यावर प्राथमिक उपचार चालू केले. त्याला नाग चावल्याची प्राथमिक लक्षणे दिसू लागली त्यामुळे तातडीने सर्पदंश विरोधी लस देण्यात आली; परंतू त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्याच्या जीवास धोका निर्माण झाला होता. त्याला कृत्रिमरीत्या श्वास देण्याची गरज होती. त्यामुळे नारायणगांव ता. जुन्नर येथील सर्प व विषबाधा तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये बालकास दाखल करण्यात आले. तेथे पोहोचेपर्यंत त्या बालकाची अवस्था अतिगंभीर झाली होती. त्याला तातडीने व्हेंटीलेटरव्दारे कृत्रिम श्वास पुरवठा करण्यात आला. त्यानंतर २४ तास देण्यात आलेल्या अथक उपचारांना यश आले व या बालकाची प्रकृती सुधारू लागली.

आता तो धोक्याबाहेर आला आहे, अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र, सावरगांवचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एम्. बी. भोर यांनी दिली. सावरगांव येथील आरोग्य केंद्रात व नारायणगांव येथे डॉ. सदानंद राऊत व डॉ. पल्लवी राऊत यांच्याकडून वेळेवर मिळालेल्या तातडीच्या उपचारांमुळे  आपल्या मुलाला नवीन जीवन मिळाल्याची भावना त्याच्या पालकांनी व्यक्त केली.

सर्पदंशाच्या रुग्णावर वेळ न दवडता योग्य ते उपचार केल्यास रुग्ण निश्चित वाचतो. जनतेमध्ये सर्पदंशाविषयी जागृती वाढत असल्यामुळे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्पदंश विरोधी लसीचा वापर होत असल्यामुळे ग्रामीण भागात सर्पदंशाचे मृत्युचे प्रमाण खूप कमी झाले आहे; परंतू कृत्रिम श्वास देणे, अंतर्गत रक्तस्त्राव, किडनीेची कार्यक्षमता बंद होणे, सर्पदंश झालेला अवयव निकामी होणे अशा गुंतागुंतीेवर योग्य ते उपचार होणे गरजेचे आहे अशी माहिती डॉ. राऊत यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com