बालशिक्षण परिषदेत शैक्षणिक साहित्याच्या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद

बालशिक्षण परिषदेत शैक्षणिक साहित्याच्या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद

पुणे : महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेचे २४ वे राज्यव्यापी अधिवेशन येथील संस्कृती लॉन्स मध्ये आज शुक्रवार ( ता. २७ ) पासून सुरू झाले असून तेथील शैक्षणिक साहित्याच्या प्रदर्षनाला विद्यार्थी, पालकांबरोबर शिक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. ' बालशिक्षणाचे तंत्र आणि तंत्रज्ञान ' या विषयावर रविवार ( ता. २९ ) पर्यंत तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात शिक्षण तज्ञांची व्याख्याने, शोधनिबंध वाचन, शैक्षणिक नाटीकांबरोबर शैक्षणिक साहित्यांचे प्रदर्शन हे मुख्य आकर्षन असणार आहे. 

संस्कृती लॉन्सच्या पटांगणात साधारणतः वीस एक शैक्षणिक साहित्यांचे स्टॉल हे विद्यार्थी आणि शिक्षकांकरीता चांगली पर्वणीच घेऊन आले आहेत. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक ते उच्चमाध्यमिक पासून ते काही अंशी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता येथे प्रकल्प व प्रात्यक्षिकांकरीता पुस्तकांबरोबर, शैक्षणिक साहित्य तसेच डिजीटल साधनेही उललब्ध आहेत. पूर्व प्राथमिक, प्राथमिक विद्यार्थी व शिक्षकांचा विचार केला तर भाषा विषयांचे अक्षर कटआऊट, अक्षर पेटी, चित्र व मुळाक्षरे येथे पहावयास मिळतील. मदतनीस ( हेल्परसंच ) यात डॉक्टर, पोस्टमन, पोलिस, सैनिक, हमाल तर धंदेवाईकांमध्ये सुतार, कुंभार, लोहार, शेतकरी, शिंपी यांचे कटआउट शिक्षकांना शैक्षणिक साधने म्हणून उपयोगी पडतील.

वळण लागणाऱ्या संस्कारक्षम वयात शिवचरित्राचे दर्शन येथील साधनांमधून पाहायला मिळते. शिवजन्म ते शिवराज्याभिषेकाचे २१ चित्रे येथील स्टॉलवर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. लाकडी किल्ला व इतर किल्ल्यांचे कटआउट विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक कुतुहल निर्माण करीत आहे. प्राणी, पक्षी व त्यांची निवासस्थाने जसे की चिमणीचे घरटे, सिहांची गुहा, मासाचे पाणी या सारखी शैक्षणिक घरी बनविता येणारी शैक्षणिक साधणे विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी आहेत.

शिक्षक व पालकांसाठी या प्रदर्शनात
मुलांचा वर्ग कसा दिसावा ? कसा असावा ? मुलांना केवळ वह्या व पुस्तकांची गरज नसून शैक्षणिक साधने काय मदत करतात हे येथे पाहायला मिळतेय. रचनावादी शिक्षण यात प्रकल्पाचे शिक्षकाला असणारे फायदे, मूल्यमापन कशा प्रकारे करायचे तसेच प्रकल्प घेत असताना घ्यावयाची खबरदारी याची माहिती येथील भित्तीपत्रातून मिळते. तसेच पारंपारिक व प्रकल्पाधारित बालशिक्षणाचे अनुभव तक्ते लक्ष वेधून घेताहेत. न खेळण्याचे धोके व बालानंद याची माहिती पोस्टरमधून पालकांनाही येथे मिळु शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com