पासपोर्टसाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट आवश्‍यक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

पुणे : ज्येष्ठ नागरिक व पाच वर्षांखालील मुला-मुलींचे पासपोर्ट काढण्याकरिता ऑनलाइन अपॉइंटमेंट (निश्‍चित वेळ) घेणे आवश्‍यक करण्यात आले आहे.

ऑनलाइन ऍप्लिकेशन केल्यानंतरही पासपोर्ट सेवा केंद्रांवर नागरिकांच्या होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण यावे, या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अनिलकुमार सिंह यांनी कळविले आहे. 

पासपोर्टसाठी ऑनलाइन ऍप्लिकेशन करणे सर्वांनाच बंधनकारक आहे. मात्र अनेकदा अपॉइंटमेंट न घेताच नागरिक पासपोर्ट सेवा केंद्रावर येतात. त्यामुळे केंद्रावर गर्दी वाढते. भविष्यात कामात सुसूत्रता यावी, नागरिकांना अधिकाधिक चांगली सेवा पुरविता यावी, याकरिता ऑनलाइन अपॉइंटमेंट घेतल्यास ठरलेल्या तारखेला व वेळेला संबंधितांना येता येईल; तसेच कामेही वेळेत होतील, असे सिंह यांनी सांगितले.