महाविद्यालयीन तरुणीची भरारी; विसाव्या वर्षी दुसरे पुस्तक; कला क्षेत्रातही स्टार्टअप!

devaki purohit
devaki purohit

पुणे : लहानपणी गोष्टींची पुस्तके वाचायला, गोष्टी ऐकायला सर्वांनाच आवडतात. परिकथा, भयकथा, जादूच्या, विज्ञानातील गमतीच्या अशा कथा आपण एकदा तरी ऐकल्या, वाचल्या असतीलच... पण याही पुढे जाऊन कोणी बालपणीच कथा लिहायला लागलं तर? आश्‍चर्य वाटत असेल ना! परंतु पुण्याच्या देवकी पुरोहित हिने वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी आपले दुसरे पुस्तक प्रकाशित करीत ही गोष्ट साध्य केली आहे. त्यासोबतच कला क्षेत्रातील एक स्टार्टअपही तिने सुरू केले आहे. 

विशेष म्हणजे केवळ लिखाणापुरते मर्यादित न राहता देवकीने "सुमन्स क्रिएशन्स' ही स्वतःची प्रकाशन संस्थाही सुरू केली आहे. सिम्बायोसिस महाविद्यालयात वाणिज्य शाखा पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या देवकीला लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. "हॅरी पॉटर' कथामालिकेद्वारे जगभराला वेड लावणारी लेखिका जे. के. रोलिंग ही आपली प्रेरणा असल्याचे देवकी सांगते. म्हणूनच की काय, आतापर्यंत तिने "हॅरी पॉटर'च्या सर्वच पुस्तकांचे अक्षरशः पारायण केले आहे.

त्यातूनच मला लिहिण्याची आवड निर्माण झाली. सुरवातीला छोट्या छोट्या कविता लिहू लागले. त्यातून हळूहळू लिहिण्याची सवय वाढली, लेखनातील वेगळेपण खुणावू लागले. तीच माझ्या लेखनाची सुरवात होती. वयाच्या चौदाव्या वर्षी मी माझे पहिले पुस्तक लिहिले, ते म्हणजे "झोरियावर्स प्रॉपेसी'. पुढे दोन वर्षांनी ते पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाला वाचकांकडूनही भरभरून प्रतिसाद मिळाला. एवढेच नव्हे, तर पेंग्विन-पॅट्रिज इंडिया या संस्थेने आंतरराष्ट्रीय स्तरावर हे पुस्तक पुनःप्रकाशित केले, असेही तिने सांगितले. 

देवकीचे नुकतेच प्रकाशित झालेले "हिडन इन द स्कार्स' हे पुस्तक भावनिक- काल्पनिक (इमोशनल फिक्‍शन) प्रकारातील पुस्तक आहे. स्वत्वाच्या शोधात असलेल्या मुलीचा प्रवास, तिचे अनुभव या पुस्तकातून मांडण्यात आले आहेत. मानसशास्त्राच्या अंगाने कथेची रचना करण्यात आली आहे. हे पुस्तकही वाचकांच्या आवडीस नक्की उतरेल, असा विश्‍वास देवकीने व्यक्त केला आहे. 

आपल्या प्रकाशन संस्थेबाबत देवकी म्हणाली, ""सुमन्स क्रिएशन्स हा कला क्षेत्रातील एक स्टार्ट-अप आहे. पुस्तक प्रकाशित करताना लेखनापासून प्रकाशनापर्यंत अनेक गोष्टी असतात. मला आलेल्या अनुभवांच्या आधारावर या प्रकियेबद्दल बरीच माहिती मिळाली आहे. त्याचाच उपयोग करून या संस्थेमार्फत लेखन क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी छपाईपासून- प्रकाशनापर्यंत सर्व मदत उपलब्ध करून देण्याचा मानस असणार आहे. याची सुरवात माझ्या दुसऱ्या पुस्तकाद्वारे केली आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com