झेडपीच्या अारोग्य सभापतींची गाडी झाली रुग्णवाहिका

झेडपीच्या अारोग्य सभापतींची गाडी झाली रुग्णवाहिका

वालचंदनगर : वेळी दुपारची सव्वा दोनची...लासुर्णे जवळील चिखली फाटा येथे एक युवक व आजोबा दुचाकीवरुन चालले असताना युवकाला अचनाक फीट (चक्कर) आल्याने रसत्यालगत बेशुद्ध पडला होता....पुणे जिल्हा परिषदेच्या  बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी प्रसंग पाहताच  स्वत:च्या गाडीमध्ये युवकाला टाकून लासुर्णे (ता.इंदापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी नेवून उपचार केले...माने यांच्या मुळे युवकाला वेळेत उपचार मिळाल्याची घटना घडली.

वडवली (ता. माढा जि.सोलापूर) येथील रघुनाथ पिसाळ व योगेश राजेंद्र पिसाळ(वय २५) हे दोघेजण भवानीनगर येथे विवाहसमारंभासाठी आले होते.विवाहसमारंभ झाल्यानंतर दुचाकीने वडवली गावाकडे जात असताना लासुर्णे  जवळील चिखली फाटा

येथे अचानक फीट आल्याने दुचाकी थांबवून रस्त्याच्या कडेला आजोबा रघुनाथ पिसाळ छातीला मसाल करत होते. यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने हे बारामतीकडे जात असताना त्यांनी हा प्रंसंग पाहिला.व त्वरित  गाडी थांबवून स्वत:च्या गाडीमध्ये योगेश पिसाळ घेवून  लासुर्णे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेले. डाॅ.गावडे यांनी तातडीने पिसाळ यांच्यावर उपचार करण्यास सुरवात केली. सभापती माने उपचार होईपर्यंत दवाखान्यामध्ये थांबून होते.तसेच पुढील उपचारासाठी खासगी दवाखान्यामध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिका देण्याची सूचना ही केली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष गजानन वाकसे यांनीही युवकाला मदत केली.

माने दादांच्या पोरानं केली लाख मोलाची मदत

सोनाई डेअरी मुळे सोलापूर जिल्हामध्ये दशरथ माने प्रसिद्ध आहेत. प्रवीण माने हे दशरथ माने यांचे चिरंजीव अाहे. रघुनाथ पिसाळ यांना दशरथ माने ओळखीचे आहेत. माने दादाच्या पोरानं आम्हाला लाख मोलाची मदत करुन दवाखान्यामध्ये आणले असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com