लोकपाल, शेतकऱ्यांसाठी जनआंदोलन : अण्णा हजारे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

राळेगणसिद्धी : भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर येऊन तीन वर्षे झाली, तरी लोकपाल कायद्याची अंमलबजावणी होत नाही. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे सरकार ठोस निर्णय घेत नाही. त्यासाठी पुन्हा एकदा तीव्र जनआंदोलन सुरू करण्याचा निर्धार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज बोलून दाखविला. 

राष्ट्रीय पातळीवरील कार्यकर्त्यांच्या शिबिरात हजारे यांनी ही भूमिका मांडली. ते म्हणाले, ""देशातील भ्रष्टाचार काही दिवसांत वाढतच आहे. त्याची झळ सामान्य माणसाला बसते.

भ्रष्टाचारमुक्त भारत हे आपले उद्दिष्ट आहे. ते पूर्ण होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही.'' केंद्र सरकारला तीन वर्षांमध्ये अनेक पत्रे लिहिली. लोकपाल, जनतेची सनद यासह भ्रष्टाचाराला आळा घालणाऱ्या विविध कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने काहीच कार्यवाही केली नाही. सरकारची तशी इच्छा दिसत नाही, त्यामुळेच पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाची गरज निर्माण झाली, अशी टीकाही हजारे यांनी केली. 

आगामी आंदोलनाची तयारी म्हणून कार्यकर्त्यांचे दोन दिवसांचे शिबिर आयोजित करण्यात आले असून, शिबिरात आंदोलन व त्याच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. विविध राज्यांतील कार्यकर्ते या शिबिरास उपस्थित आहेत.