नदीकाठच्या रस्त्याबाबत सुळे-आयुक्त चर्चा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

पुणे : सिंहगड रस्त्यावरील मुठा नदीच्या पात्राजवळील रस्त्याबाबत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एनजीटी) आदेशाचे पालन करतानाच रस्त्याची समस्या तातडीने सोडविण्यासाठीच्या बहुविध पर्यायांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिकेत आयुक्त कुणाल कुमार यांच्याशी चर्चा केली.

परिसरातील रहिवाशांना नदीपात्रातील पुराच्या पाण्याचा त्रास होणार नाही आणि रस्ताही उपलब्ध व्हावा, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. 

सिंहगड रस्त्यावरील नदीपात्राजवळ पूर नियंत्रण रेषेत महापालिकेने उभारलेला रस्ता उखडण्याचा आदेश 'एनजीटी'ने दिला आहे. मात्र, हा रस्ता सुधारित पूर नियंत्रण रेषेच्या बाहेर आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्याबाबत त्यांनी न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. या पार्श्‍वभूमीवर न्यायालयाच्या आदेशाचे पालन करतानाच नागरिकांसाठी रस्ता उपलब्ध करावा आणि नदीपात्राजवळील भराव काढल्यामुळे सोसायट्यांत पाणी जात असून, त्याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली. नगरसेवक विशाल तांबे, युवराज बेलदरे तसेच काका चव्हाण, शैलेश चरवड, दीपक बेलदरे आदींचा यात समावेश होता. 

धनकवडी, सिंहगड रस्ता, वारजे आणि बावधनमध्ये ई-वेस्ट कलेक्‍शन सेंटर उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्याव्यात, असे आयुक्तांना सुचविले. महापालिकेच्या शाळांतील आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी पाच शाळांमध्ये सलाम बॉम्बे फाउंडेशन आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान प्रकल्प राबविण्यासाठी तयार आहे, असेही सुळे यांनी सांगितले. त्यावर पाच शाळा उपलब्ध करून देऊ, असे आश्‍वासन आयुक्तांनी दिले. 

आंबेगाव बुद्रुक विंडसर कौंटी ते रेलिकॉन सोसायटी दरम्यान वळणावरच्या रस्त्यामुळे अपघात होत आहेत. त्यामुळे हा रस्ता सरळ करावा, अशी मागणी शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली. या प्रसंगी सन प्लॅनेट, राधाकृष्ण रेसिडेन्सी, श्‍यामसुंदर सोसायटी, आनंद पार्क, साई सिद्धार्थ, जलतरंग, द्वारका अपार्टमेंट आदी सोसायट्यांमधील रहिवासी उपस्थित होते.