देशाचे रक्षण करण्यासाठी 'हम है ना' : डी. आर. सोनी 

representational image of Indian Army Jawan
representational image of Indian Army Jawan

पुणे : ''शत्रू जरी तोच असला, तरी तंत्रज्ञान आणि जागतिक अर्थकारणामुळे आज युद्धाचे स्वरूप बदलले आहे. मात्र प्रत्येक परिस्थितीत देशाचे रक्षण करण्यासाठी 'हम है ना!'', असा विश्‍वास लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी यांनी व्यक्त केला. 

मुख्यालयातर्फे आयोजित केलेल्या विजय दिवस कार्यक्रमानिमित्त त्यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. युद्धाचे बदलते स्वरूप, भारतीय सैन्याची तयारी आणि सैन्याचे मनोबल, अशा विविध विषयांवर ते बोलत होते.

सोनी म्हणाले, ''दहशतवाद, घुसखोरी यासारख्या घटनांचा सामना करण्यासाठी भारतीय सैन्य सक्षम आहे. कोणत्याही प्रकारच्या युद्धाचा सामना करण्यासाठी भारतीय सैन्याला आधुनिक प्रशिक्षण दिले जाते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे युद्धासाठी आवश्‍यक ते मनोबलही त्यांच्यामध्ये आहे. देशाविरोधातील सर्व संकटांचा बीमोड करण्यासाठी भारतीय सैन्य सदैव तत्पर आहे.'' 

'सर्जिकल स्ट्राइक' ही आपल्या सैनिकांच्या प्रोत्साहनात भर घालणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. हा 'स्ट्राइक' सैन्याच्या युद्धकौशल्यांतील केवळ एक प्रकार होता, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com