जलवाहतूक स्वस्त होते, ती वाढविण्यावर भर- नितीन गडकरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

'मी मंत्री झाल्यापासून चांदणी चौकाच्या डिझाईनवर काम सुरू आहे. हे डिझाईन अवघड आहे. पुढील 25 वर्षांचे नियोजन असून, 14 हेक्टर जागेपैकी 4 हेक्टर जागा ताब्यात आली आहे. पालिका जागा देणार आहे. येथे वाहतूक कोंडी होते, ती कमी केली जाईल,' असे गडकरी यांनी सांगितले. 

पुणे : देशात वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. पुण्यात ही वाढ जास्त होत आहे. वाहनांची वाढ जास्त होत असल्याने देशात 7500 समुद्र मार्ग, 111 नद्यांवर जलमार्ग सुरू करण्याचे नियोजन आहे. पाण्यावरून स्वस्त वाहतूक होते, त्यामुळे ती वाढविण्यावर भर आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. 

सरकारने राष्ट्रीय महामार्ग वाढविले. हवेतून चालणाऱ्या बसेस आणल्या. मुळा मुठा नदीत जलवाहतूक महामार्ग सुरू होऊ शकतील. जहाजातून 2000 च्या ऐवजी 4000 किलो टन माल जातो. कोळशापासून मिथेन वायू बनवून जहाज चालतील. ऑटो हब असलेल्या पुण्यातुन JNPT वरून मोठी निर्यात केली जाते. तसेच, नगर, सोलापूर, सांगली येथे ड्राय पोर्ट बांधणार आहोत, असे गडकरी यांनी सांगितले. 

पुण्यात हवाई वाहतूक सुरू करण्याची तयार आहे. पायलट प्रोजेक्ट करता येईल. इलेक्ट्रिक बस, डबल डेकर बस सुरू करता येतील. नागपूरला 200 टॅक्सी बस सुरू केल्या आहेत. 

रिंगरोड राज्य सरकारकडे आहेत. मी केंद्रात महाराष्ट्राचा अँबॅसेडर आहे. पालखी मार्ग करणार ते अधिक चांगले करणार आहोत. पुढील 3 महिन्यांत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे भूमिपूजन करणार आहोत. वाखरीला 10 हेक्टर जागा असून, भंडीशेगाव वेळापूर येथे पालखी तळ करण्यात येणार आहे. 
पालखी पायी चालणाऱ्यांसाठी हिरवळ करणार आहे. यामध्ये परदेशी गुंतवणूक नाही. यासाठी बँकेपेक्षा जास्त व्याज देऊन पैसे उभे करणार, असे गडकरी यांनी सांगितले. 

चांदणी चौक रस्त्यावरील उड्डाणपुलाचे डिझाईन 'IIT मुंबई'कडून करून घेतले आहे, अशी माहिती NHAI चे अधिकारी डी.ओ. तावडे यांनी दिली. 

पुणे

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्र राज्यात सगळीकडे पाऊस बरसत आहे. दोन ते...

04.18 PM

पुणे : "मुस्लिमधर्मीय पुरुष कायद्याचा उपयोग स्वतःच्या सुखप्राप्तीसाठी करत असताना...

11.12 AM

मंचर : वाळद (ता. खेड) येथे सायली निलेश शिंदे (वय ७) या मुलीला घरात खेळत असताना सोमवारी (ता.१८) संध्याकाळी पाच वाजता सर्पदंश झाला...

08.54 AM