‘शिवनेरी भूषण’ पुरस्कारांचे वितरण

जुन्नर - ‘सकाळ’चे बातमीदार दत्ता म्हसकर (डावीकडून तिसरे) यांना ‘शिवनेरी भूषण’ पुरस्कार प्रदान करताना मान्यवर.
जुन्नर - ‘सकाळ’चे बातमीदार दत्ता म्हसकर (डावीकडून तिसरे) यांना ‘शिवनेरी भूषण’ पुरस्कार प्रदान करताना मान्यवर.

ओतूर - जुन्नर तालुक्‍यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम केलेल्यांना शिवजयंती उत्सवानिमित्ताने जुन्नर येथे मानाचा ‘शिवनेरी भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी उपस्थित मान्यवरांना शाल व पुष्पगुच्छ न देता आमदार सोनवणे यांनी ‘श्रीमंत योगी’ ग्रंथ देऊन त्यांचे स्वागत केले. ‘शिवनेरी भूषण’ पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख अकरा हजार रुपये, असे आहे.

पत्रकारितेतील ‘शिवनेरी भूषण’ पुरस्कार ‘सकाळ’चे जुन्नरचे बातमीदार दत्ता म्हसकर यांना आणि ओतूरचे ज्येष्ठ पत्रकार भरत अवचट यांना देण्यात आला. तसेच, बाजीराव दांगट, प्रकाश खांडगे, अनिलतात्या मेहेर, माउली महाराज वाबळे, केरुशेठ वेठेकर, रमेश खरमाळे, महादेव वाघ, वैभव गायकवाड, राजश्री बोरकर, सुंदरताई कुऱ्हाडे, तात्यासाहेब गुंजाळ, विष्णूपंत महाराज ढमाले, गणेश वाळूंज, मुरलीधर काळे, जे. एल. वाबळे, मालती डुंबरे यांना ‘शिवनेरी भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. स्वर्गीय निवृत्तिशेठ शेरकर, शिवाजीराव काळे, विलास तांबे, शहीद प्रमोद महाबरे यांना मरणोत्तर ‘शिवनेरी भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तो त्यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारला. तसेच, या वेळी शंभर टक्के निकाल लागलेल्या तालुक्‍यातील १४ माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांचाही सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com