ऑनलाइन व डॉक्‍टरांच्या औषध विक्रीमुळे रिटेल फार्मसीला कॅन्सर- तापकीर

Tapkir
Tapkir

पिंपरी (पुणे) : ऑनलाइन फार्मसी व डॉक्‍टरांकडून अनधिकृतपणे औषध विक्री करणे म्हणजे रिटेल फार्मसीला जडलेला कॅन्सर आहे. यामध्ये कधी रिटेल फार्मसीचा जीव जाईल सांगता येत नाही. असे मत काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विवेक तापकीर यांनी व्यक्त केले आहे. 

तापकीर यांनी प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे की, सरकारच्या डिजिटल इंडिया या धोरणाखाली ऑनलाइन फार्मसीला मान्यता देण्याच्या उंबरठ्यावर आहे. ऑनलाइन फार्मसीवाले व डॉक्‍टर सर्रासपणे निर्भीडपणे प्रशासनास न जुमानता औषध विक्री करीत आहेत. होलसेल फार्मसी व डॉक्‍टर यांचा अलबेला आहे. कारण शेड्यूल "के'चा आधार घेत रिटेल फार्मसीवर आक्रमण करून रिटेल फार्मसीचा विचारपूर्वक गळा आवळण्याचे काम करत आहेत. हे कुठेतरी प्रशासन व्यवस्थेने थांबवून कायद्याची पायमल्ली करणारे यांची लगाम खेचून यांची घोडदौड थांबवली पाहिजे, नाहीतर राजरोसपणे गर्भपाताच्या, नशेच्या, झोपेच्या औषधांची विक्री वाढण्याची शक्‍यता आहे आणि सबंध तरुण पिढी बरबाद होईल. 
शेड्यूल औषधांची विक्री करताना रिटेल फार्मसी मधून "सप्लाईड बाय'चा शिक्का मारून औषधांची विक्री करणे अनिवार्य आहे. परंतु ऑनलाइन किंवा डॉक्‍टर सध्या त्याचा वापर करताना दिसत नाहीत. त्यामुळे त्या औषधांची विक्री वेगवेगळ्या ठिकाणी ऑनलाइन फार्मसीद्वारे होताना दिसते. सरकारने व प्रशासनाने योग्य ती कायदेशीर कारवाई करावी आणि भविष्यात होणारे परिणाम ओळखून योग्य ती पावले उचलण्यात यावेत. असे पत्रात नमुद केले आहे. याबाबत डॉक्‍टर असोसिएशनच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला असता, त्यांनी बोलण्याचे टाळले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com