पिंपरीत 'एक गाव एक शिवजयंती'चे आयोजन 

Shivaji-Maharaj
Shivaji-Maharaj

पिंपरी - पिंपरीत एक गाव एक शिवजयंती महोत्सवांतर्गत अखिल पिंपरी शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शनिवार (ता. 24) ते 4 मार्चपर्यंत विविध सामाजिक उपक्रम व सौरभ कर्डे, प्रसाद मोर, राजसिंह ठाकूर यांचे शिवचरित्र व्याख्यान व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
महोत्सवांतर्गत आरोग्य शिबिर, चित्रकला व रांगोळी स्पर्धा, वायसीएम रुग्णालयात रुग्णांना फळवाटप, भोसरीतील अंधशाळेस, चिंचवडमधील गुरुकुलम अनाथ आश्रमास व गा-ेशाळेस मदतनिधी, महाशिववंदना व स्वच्छता अभियान उपक्रम आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

सांगता समारोप 
4 मार्चला महोत्सवाच्या सांगता समारोपानिमित्त सकाळी सात वाजता श्री शिवमूर्तीस अभिषेक, सायंकाळी चार वाजता शगुन चौक ते पिंपरी शिवस्फूर्ति स्मारक भैरवनाथ चौकापर्यंत शिवछत्रपतींची भव्य पालखी मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. या वेळी भव्य मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिके, फायर-शो आणि महाप्रसादाचे वाटप होणार आहे. 

संयोजनात सहभाग 
जगदंब प्रतिष्ठान, ज्योती मित्र मंडळ, भारत युवक विकास परिषद, शिवालय मित्र मंडळ, दीप मित्र मंडळ, गजानन मित्र मंडळ, भीमज्योत मित्र मंडळ, शंभू प्रतिष्ठान, जय भवानी मित्र मंडळ, स्वराज्य प्रतिष्ठान, शिवशक्ती मित्र मंडळ, शिवांजली मित्र मंडळ, समर्थ हनुमान मित्र मंडळ, पवना मित्र मंडळ, शिवछत्रपती मित्र मंडळ, शिवसाम्राज्य मित्र मंडळ, लोकमान्य डायमंड मित्र मंडळ, अमरदीप मित्र मंडळ, अभिमन्यू मित्र मंडळ, शिवाजी मित्र मंडळ, मित्र सहकार्य मित्र मंडळ, जोग महाराज प्रासादिक दिंडी, दक्षिणमुखी श्रीहनुमान मंदिर, श्री भैरवनाथ तालीम, श्री सावता महाराज मंदिर समिती, चैतन्य कानिफनाथ सेवा ट्रस्ट, संकल्प मित्र मंडळ, शिवदत्त मित्र मंडळ, आवाज मित्र मंडळ, शिवाई मित्र मंडळ, सावली ग्रुप, भगतसिंग मित्र मंडळ, औदुंबर सेवा प्रतिष्ठान, गोठा प्रतिष्ठान, धर्मवीर संभाजी मित्र मंडळ, अर्जुन मित्र मंडळ, आझाद मित्र मंडळ, अभिमन्यू मित्र मंडळ, सुदर्शन मित्र मंडळ, अजिंक्‍य मित्र मंडळ, राजेशाही ग्रुप, ईगल मित्र मंडळ, समस्त ग्रामस्थ पिंपरी, सिंधी समाज, पिंपरी गुरुद्वारा आदि मंडळांनी सहभाग घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com