हडपसरमध्ये पीएमपी जळून खाक

bus
bus

हडपसर : हडपसरकडून सासवडकडे जाणा-या 'पीएमपी' बसला दिवेघाटात अचानक आग लागल्याने बस जळून खाक झाली. सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बस घाट चढून जात असताना बसने अचानक पेट घेतला. शॅार्टसर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

बसला आग लागल्याचा प्रकार प्रवाश्यांच्या लक्षात आल्याने एकच धावपळ उडाली होती. बसमध्ये काही काळ भीतीचे वातावरणही पसरले होते. प्रवाशांची उतरण्याची लगबग सुरू असतानाच बसने पेट घेतला. ठेकेदारी पद्धतीने पीएमपीच्या ताफ्यात समावेश करण्यात आलेली ही बस सीएनजीवर चालणारी होती. सुदैवाने अग्निशामकदलाच्या हडपसर व सासवड येथील दोन गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. यावेळी बघ्यांची तोबा गर्दी आणि वाहतूक कोंडी झाली होती.

लोणी-काळभोर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू महाडिक यांच्या पथकाने झालेली वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलीसांनी नागरिकांना बसपासून दूर अंतरावर पळवून लावत दुर्घटना टाळण्यात मदत केली. बसच्या वाहक व चालकाच्या सावधानतेमुळे जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशामकदलाच्या कर्मचा-यांनी दिली. सदर बस हडपसर बस डेपोची असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com