अजित पवारांनी केले आमदार भरणे यांच्या कामाचे कौतुक

राजकुमार थोरात  
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

वालचंदनगर - राज्यात व केंद्रात विरोधी पक्षाचे सरकार असताना देखील आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या प्रयत्नामुळे इंदापूर तालुक्यामध्ये केंद्र व राज्यसरकारचा निधी येत असल्याबद्दल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार भरणे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. अप्रत्यक्षपणे 2019 च्या विधानसभेची उमेदवारी भरणे यांनाच देण्याचे संकेतही दिले. इंदापूर तालुक्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नुकताच एक दिवसाचा दौरा पार पडला. या दौऱ्यामध्ये पवार यांनी आमदार भरणे यांच्या तोंडभरुन कौतुक केले. 

बोरी येथील कार्यक्रमामध्ये तर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये बारामतीसह जिल्हातील सहा महत्वाच्या तालुक्याचा समावेश झाला नाही. मात्र 'मामांनी' केलेल्या प्रयत्नामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून इंदापूर तालुक्याचे रस्ते मंजूर झाले आहेत. तसेच केंद्रीय मार्ग निधीतून मामांनी नितीन गडकरी यांच्याकडून वालचंदनगर - डाळज रस्त्यासाठी निधी आणला आहे. इंदापूर तालुक्यातील जनतेने आमच्या विचाराचा आमदार निवडून दिल्यामुळे तालुक्याचा भरणे यांच्यामुळे विकास होत असल्याचे कौतुक पवार यांनी केले. 2019 च्या विधानसभा निवडणूकीपूर्वी राज्यामध्ये राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी होण्याचे संकेत दोन्ही पक्षाने यापूर्वीच दिले आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी झाल्यास इंदापूर तालुक्याच्या जागेवरुन दोन्ही पक्षामध्ये पेच निर्माण होणार आहे. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे काँग्रेस पक्षातील वजनदार नेते असून इंदापूरच्या जागा काँग्रेसला राखीव सोडण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यामान आमदार दत्तात्रेय भरणे यांचे तोंडभरुन कौतुक केल्यामुळे इंदापूरच्या जागा भरणे व पाटील दोघांपैकी कोणाला मिळणार याची उत्सुकता लागून राहणार आहे.

Web Title: marathi news pune ajit pawar mla dattatray bharane work