विनयभंग करणाऱ्याला एक वर्षाची शिक्षा 

संदीप घिसे 
गुरुवार, 8 मार्च 2018

पिंपरी - अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना 2014मध्ये निगडी येथे घडली होती. याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला एक वर्षाची शिक्षा आणि दीड हजार रुपये दंड ठोठावला आहे. सचिन शिवाजी येडे (वय २८ रा. शिंदेवस्ती, रावेत) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. 

याबाबत मुलीच्या वडिलांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. निगडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 जानेवारी 2014 रोजी आरोपी सचिन याने अल्पवयीन मुलीच्या वडिलांना रस्त्यात गाठले. तुमच्या मुलीचा एमएमएस आणि फोटो माझ्याकडे असून, त्या फोटोंचा मी गैरवापर करणार आहे. अशी धमकी त्यांना दिली होती. यामुळे पिडित मुलीच्या वडिलांनी आरोपी सचिन याच्या हातातील मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांचा चावा घेतला. तसेच फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग देखील केला. याबाबत गुन्हा दाखल झाल्यावर पोलिस उपनिरीक्षक एस. यू. कांबळे यानी केलेल्या तपासाच्या आधारे भक्कम पुराव्यावरून आरोपी सचिन येडे याला एक वर्षाची शिक्षा आणि दीड हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली.

Web Title: marathi news pune crime MMS