संकष्टी चतुर्थी निमित्ताने लेण्याद्रीला भाविकांची गर्दी        

दत्ता म्हसकर
सोमवार, 5 मार्च 2018

संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांनी श्री क्षेत्र लेण्याद्री येथे पहाटेपासून मोठी गर्दी केली होती.

जुन्नर - अष्टविनायक गणपतींपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री येथील श्री गिरिजात्मज गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आज सोमवार (ता. 5) संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष गोविंद यशवंत मेहेर यांनी दिली.

सकाळी देवस्थानचे खजिनदार सदाशिव ताम्हाणे यांच्या उपस्थितीत 'श्री'ना महाअभिषेक करण्यात आला. देवस्थानचे विश्वस्त तसेच कर्मचारी व भाविक उपस्थित होते. दिवसभरात देवस्थानचे अध्यक्ष मेहेर, सचिव शंकर ताम्हाणे, विश्वस्त काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, प्रभाकर जाधव, मच्छिद्र शेटे,जितेंद्र बिडवई, रोहिदास बिडवई संजय ढेकणे यांनी भेट दिली. पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक तसेच जुन्नर परिसरातून श्री गणेशाच्या दर्शनासाठी भाविक येत होते. मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी विविध सेवा पुरविण्यात आल्या. सायंकाळी शिवेचिवाडी येथील मुक्ताई भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. रात्री चंद्रोदय समयी 9:58 वाजता गिरिजात्मजकाची महाआरती व नंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे.

Web Title: marathi news pune junnar news religious lord ganesh chaturthi