आई प्रतिष्ठानने केले प्राणत्याग आंदोलन 

रूपाली अवचरे
शनिवार, 20 जानेवारी 2018

विश्रांतवाडी, नागपूरचाळ, शांतीनगर, फुलेनगर, प्रतीकनगर, येरवडा, टिंगरेनगर परिसरात अनेक वर्षे विकास कामे रखडलेली आहेत. मात्र पुणे महानगरपालिका किंवा राज्य शासनाचे विविध विभाग याकडे लक्ष देत नसल्याने समस्या वाढ चाललेल्या आहेत. तरी कोणतेच प्रशासन विकास काम करत नसल्याने समोर आले आहे.

पुणे : विश्रांतवाडी प्रभाग क्रमांक दोनमधील विविध विकास कामे प्रशासनाने त्वरित पूर्ण करावी या मागणीसाठी आई प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी प्राणत्याग आंदोलन केले. कार्यकर्ते स्वत:ला फाशी लावून घेत असतानाच पोलिसांनी वेळेवर येऊन आंदोलन थांबविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

विश्रांतवाडी, नागपूरचाळ, शांतीनगर, फुलेनगर, प्रतीकनगर, येरवडा, टिंगरेनगर परिसरात अनेक वर्षे विकास कामे रखडलेली आहेत. मात्र पुणे महानगरपालिका किंवा राज्य शासनाचे विविध विभाग याकडे लक्ष देत नसल्याने समस्या वाढ चाललेल्या आहेत. तरी कोणतेच प्रशासन विकास काम करत नसल्याने समोर आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी, राज्याचे बांधकाम विभाग, रस्ते विभाग, तसेच पुणे महानगरपालिक आयुक्त, तसेच मुख्यमंत्री यांना तक्रारीचे निवेदन पाठवून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने आई प्रतिष्ठानाच्या कार्यकर्त्यांनी संतप्त होऊन आंबेडकर कॉलनीजवळील अग्रसेन हायस्कूलशेजारी प्राणत्याग आंदोलन गुरुवारी दुपारी करत होते.

प्राणत्याग आंदोलनात कार्यकर्त्यांनी स्वत:ला ङ्गाशी लावून आपला प्राण संपविणार होती.परंतु येरवडा पोलिसांना कंट्रोलचा कॉल आल्याने आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन आंदोलन थांबविले. प्रेसकॉलनी व विश्रांतवाडी पोलिस व जेल पोलिस  वसाहतील ड्रेजेन, अंतर्गत रस्ते, उघड्यावरील गटारे, गार्डन समस्या त्वरित सोडव्यावात, बेरोजगारांना कामे द्यावीत, कंत्राटी कामगारांचा कायम स्वरूपी प्रश्‍न शासनाने मार्गी लावावा, कॉमर्स झोनमधील इमारतीचे ड्रेनेजचा मैला उघड्यावर सोडला आहे. त्याची घाण सर्वे ऑफ इंडियाच्या व प्रादेशिक मनोरुग्णालायत जात असून ते थांबविले पाहिजे. तसेच शांतीनगर येथील पाम गार्डनचे दुरुस्तीचे काम त्वरित सुरू करावे, प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या पाठीमागील रस्त्याचे  काम करावे आदी मागण्यांसाठी प्राणत्याग आंदोलन करण्यात आले. दरम्यान सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेऊन समज देऊन सोडले. यावेळी संस्थापक अध्यक्ष यश चौव्हान, विकास सोनवणे, राहुल मंडगेल, गणेश भिसे, चाचा खान, नजमा खान, रोहन चौव्हान, जीवन दयाळ, राजू बोत, आप्पा बनसोडे, पांडुरंग हुंबरे, कुमार निंदानी, आफताब सय्यद, सलमान खान,शब्बीर  शेख,अमिर भुरेवाल, गीता रिठे, सुनिता गायकवाड, आक्रम शेख आदी उपस्थित होते.

Web Title: Marathi news Pune news agitation