दारूच्या नशेत इमारतीवरून पडून एकाचा मृत्यु

dead
dead

औंध (पुणे) : मित्रांच्या सोबत दारू पिल्यानंतर बाल्कनीतून शिडीवर चढताना तोल जाऊन पडल्याने एकाचा मृत्यु झाल्याची घटना बालेवाडी येथील 43 प्रायव्हेट या सोसायटीत रविवारी रात्री घडली. या घटनेत अनुपम पाटील (22 वर्षे ,रा.एलाइट एम्पायर सोसायटी, बालेवाडी) याचा मृत्यु झाला आहे.

रविवारी रात्री अनुपम हा आपल्या मित्रांसह दारू पीत बसला होता. दारू प्यायल्यानंतर नशेत तो बाल्कनीतील शिडीवर चढण्याचा प्रयत्न करत  होता. या प्रयत्नात त्याचा तोल जाऊन तो सोळाव्या मजल्यावरून खाली पडला. या दुर्घटनेत अनुपम गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यु  झाल्याचे चतु:श्रूंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी सांगितले. यानंतर चतु:श्रूंगी पोलीसांनी घटनास्थळी जाऊन अनुपमला ससून रूग्णालयात हलवले. अनुपम हा सिंहगड अभियांत्रिकी(इंजिनिअरींग) महाविद्यालयात  शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता.या घटनेमुळे त्याच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com