पुणे: कोथरुड बस डेपोमध्ये बसला आग

bus
bus

पुणे : कोथरूड बस डेपोच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बसला सकाळी सातच्या सुमारास आग लागली. डेपो मधील कर्मचाऱ्यांनी वाळू, माती व अग्निशमन साधनांचा वापर करत आग नियंत्रणासाठी प्रयत्न केला. काही कर्मचाऱ्यांनी तातडीने जवळच्या बस हटवल्याने मोठा अनर्थ टळला. जवळच एमएनजीएलचे स्टेशन आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने येवून आगीवर नियंत्रण मिळविले.

बंद बसला आग कशी लागली हा प्रश्न आहे? बंद बस कोणीतरी चालू करण्याचा प्रयत्न केला असावा असा एक संशय आहे. प्रसन्नच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्याचा संबंध या आगीची आहे का हे तपासणे गरजेचे आहे असे मत काही लोकांनी व्यक्त केले. डेपोच्या जागेत सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने येथील सुरक्षा कमकुवत आहे. कोथरुड पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com