शिवबा या छाव्याने हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले : शारदा मुंढे

मिलिंद संधान
शनिवार, 20 जानेवारी 2018

नवी सांगवी : " मुगलांच्या घोड्यांच्या टापाने पुरता नेस्तनाबुत झालेल्या महाराष्ट्राला जिजाऊंच्या पोटी जन्म घेतलेल्या शिवबा या सह्याद्रीच्या छाव्याने हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले. त्यामुळेच आजही मराठ्यांचा इतिहास संपुर्ण भारतात गौरवाने वाचला जातो. " असे उद्गार प्रबोधनकार शारदा मुंढे यांनी पिंपळे गुरव येथे काढले.

ओमसाई फाऊंडेशन व कै चंद्रभागा भोसले प्रतिष्ठान यांच्या वतीने विनायक नगर, सुयोग कॉलनी येथे साई मंदिराचा वर्धापन दिन व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी आपले विचार उपस्थितांसमोर मांडले.

यावेळी व्यासपिठावर माजी उपमहापौर व नगरसेविका माई ढोरे, नगरसेवक शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोश कांबळे, सागर आंघोळकर, उद्योजक विजय पांडुरंग जगताप, चंदा लोखंडे, माधवी राजापुरे, सीमा चौगुले, शारदा सोनवणे, संजय मराठे, दत्तात्रय भोसलेक नथुराम ढोकळे उपस्थित होते. यावेळी माई ढोरे यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

प्रबोधनकार मुंढे म्हणाल्या, "दानशूर कर्णापेक्षाही श्रेष्ठ असतो तो म्हणजे मुलीचा बाप... की जी दोन्ही कुळांचा उध्दार करीत एकूनच समाज व्यवस्थेची घडी बसवीत असते. त्यामुळे घराघरात स्त्री जन्माचे स्वागत करीत असताना समाजात वावरत असताना इतर स्त्रीयांचाही आदर आपण सर्वांनीच केला पाहिजे. "

सूत्रसंचलन निलेश मातने यांनी केले तर आभार तौफिक सय्यद यांनी मानले.

Web Title: marathi news Pune News Chatrapati Shivaji Maharaj