यशापर्यंत पोहचण्याचा कोणताही शॉर्टकट नाही: जिल्हाधिकारी भोंडवे

pimpri
pimpri

नवी सांगवी (पुणे) : " यशाचा कोणताही शॉर्टकट असु शकत नाही, त्यामुळे अविरत मेहनत, जिद्द, स्वतःवरचा आत्मविश्वास आणि आईवडिल व गुरूजनांचा आर्शिवादाच तुंम्हाला सर्वोत्तम यशापर्यंत पोहचवू शकतो. " असे उद्गार उज्जेन नगरीचे जिल्हाधिकारी व पिंपरी चिंचवडवासिय संकेत भोंडवे यांनी पिंपळे गुरव येथे काढले.

पिंपरी येथील डॉ डी वाय पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्याल याच्यावतीने भोंडवे यांचा त्यांच्या प्रशासकीय सेवेतीस उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव सोहळा आणि प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी सत्काराला उत्तर देताना त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी व्यासपिठावर डी वाय पाटील विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष पी डी पाटील, सेवानिवृत्त जिल्हाधिकारी तथा ९१ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, तामिळनाडु येथील ई गव्हर्नसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पाटील, अर्जुन पुरस्कार विजेते गोपाळ देवांग, सचिन इटकर, सुमनभाई शर्मा, भाग्यश्री पाटील, स्मिता जाधव, संकेत यांच्या मातोश्री समुन भोंडवे व पत्नी हर्षदा भोंडवे उपस्थित होते. 

डी वाय पाटील महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले भोंडवे यांनी यावेळी आपल्या महाविद्यालयीन आठवणी जाग्या केल्या. अभ्यास करता करता टपरीवरचा कटिंग चहा, कन्टीनचा वडापाव, मित्रांबरोबरच्या सहली याबरोबर कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवून त्यांनी केलेल्या कामांना उजाळा दिला. स्नेहल दामले, भोंडवे यांच्या शिक्षिखा गीता मोहिते यांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यावेळी युपीएससीची तयारी करीत असताना केलेला अभ्यास, त्यात आलेल्या अडचणी आणि त्यावर केलेली मात या सर्व गोष्टींचा त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उहापोह केला. यावेळी सायली व स्नेहल शेळके यांनी रोयिंग या क्रीडाप्रकारात तर स्वप्निल ढमढेरे याच्या नेमबाजीतील कामगिरीबद्दल त्यांना महाराष्ट्र शासणाकडून शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांनाही गौरविण्यात आले.   

जिल्हाधिकारी भोंडवे म्हणाले, "सुरूवातीपासूनच मी मोबाईल पासून दूर राहिलो. कोणतेही मोठ मोठे क्लासेस लावले नाही वा बाहेर राज्यात जाऊन अभ्यास केला नाही. सावित्रीबाई फुले विद्यापिठातील जयकर ग्रंथालय, सांगवी या ठिकाणी अभ्यास केला. राष्ट्रपतींच्या हस्ते माझा तीनदा गौरव झाला परंतु माझ्या महाविद्यालयाने केलेला गौरव मला आनंद देणारा ठरला."

लक्ष्मीकांत देशमुख ः  ' डेअर टू ड्रीम आणि प्ले टू विन ' या युक्ती प्रमाणे स्वप्न पहायचे धाडस करा आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करा. इतरांपेक्षा तुंम्ही ' अनवट वाटेवरून ( वेगळ्या मार्गाने ) चला, म्हणजे सामान्यातील सामान्य यश आपोआप तुमच्या पदरात पडेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com