खेळाडूच्या अंगी असलेल्या खिलाडू वृत्तीला प्रोत्साहन देणे गरजेचे-संजय टकले

जनार्दन दांडगे
मंगळवार, 30 जानेवारी 2018

लोणी काळभोर : प्रत्येक व्यक्तीमध्ये एक उत्तम खेळाडू दडलेला असतो, त्यासाठी खेळाच्या माध्यमातून त्याच्या अंगी असलेल्या खिलाडू वृत्तीला प्रोत्साहन देणे गरजेचे असते असे मत आंतरराष्ट्रीय मोटारकार रेसिंग चॅम्पियन संजय टकले यांनी लोणी काळभोर (ता. हवेली) येथे व्यक्त केले. लोणी काळभोर येथील राजबाग येथे एमआयटी शिक्षण संस्थेच्या मैदानावर पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशन (पीएचडीए) च्या वतीने रुलर डॉक्टर्स प्रीमिअर लीग (आरडीपीएल -2018) या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन टकले यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले.  

यावेळी टकले म्हणाले, "ग्रामीण भागातील अनेक खेळ काळाच्या ओघात लोप पावत चालले आहेत. या खेळांना व ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देणे काळाची गरज आहे." यावेळी ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंना मदत करण्याची इच्छा टकले यांनी व्यक्त केली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राहुल काळभोर म्हणाले, "रुलर डॉक्टर्स प्रीमिअर लीग ही क्रिकेट स्पर्धा 30 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत. यामध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील फलटण, भिगवण, दौंड, बारामती, नगर रोड, लोणी काळभोर, ऊरळी कांचन, केडगाव, पाटस, कोरेगाव भीमा, रांजणगाव, लोणंद आदी ठिकाणाहून आलेले सुमारे अडीचशे डॉक्टर यामध्ये सहभागी झाले आहेत. वैद्यकीय व्यवसाय करताना शारीरिक स्वास्थ्य व मैत्रीपूर्ण संबंध टिकविण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली असून 16 संघामध्ये होणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना व पारितोषिक वितरण 4 फेब्रुवारी रोजी होणार आहे." 
 
Web Title: Marathi news pune news cricket league