पिंपरी: चिखलीत आढळला कुजलेला मृतदेह

crime
crime

पिंपरी ; राहत्या घरात गळफास घेऊन तरूणाने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. पोलिसांनी कुजलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

रमाकर फुलचंद राजभर (वय ३०, रा.कुदळवाडी, चिखली) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. रमाकर यांचे घर गेल्या तीन-चार दिवसापासून बंद होते. त्यातच यांच्या घरातून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळविले. निगडी पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी दरवाजा तोडला असता आत रमाकर यांचा कुजलेला मृतदेह आढळून आला.

रमाकर हा मित्रासोबत राहत होता.मित्र गावी गेल्याने सध्या तो एकटाच राहत होता. तीन दिवसांपूर्वी रमाकर यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. अधिक तपास निगडी पोलिस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com