ज्ञानसागर गुरुकुलमध्ये लाॅर्ड बेडन पाॅवेल यांची जयंती

Scout
Scout

शिर्सुफळ (पुणे) : बारामती तालुक्यातील सावळ येथील ज्ञानसागर गुरुकुल मध्ये 22 फेब्रुवारी हा दिवस स्काऊट गाईडचे जनक लाॅर्ड बेडन पाॅवेल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 

येथील गुरुकुल मध्ये स्काऊट गाईडचे जनक लाॅर्ड बेडन पाॅवेल यांच्या जन्म दिवसानिमित्त स्वच्छता अभियान, स्वच्छता रॅली, बेडन पाॅवेल यांच्या प्रतिमेचे पूजन, संचलन, निसर्गरम्य शिबीर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष व बारामती तालुका भारत स्काऊट गाईडचे उपाध्यक्ष सागर आटोळे म्हणाले, स्काऊट गाईड ही जागतिक संस्कारक्षम चळवळ असुन विद्यार्थ्यांचा शारिरीक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक विकास होण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम या चळवळीच्या माध्यमातून राबविले जातात.स्काऊट गाईड या चळवळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार, पंतप्रधान ढाल स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन हे पुरस्कार प्राप्त करता येतात. यामध्ये अधिकाधिक शाळांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शंकर नागरी पतसंस्थेचे शाखाधिकारी संजय कर्वे यांच्या हस्ते बेडन पाॅवेल यांच्या प्रतिमेचे पूजन व स्काऊट गाईड चे प्रतिक असणारा भारत स्काऊट चा ध्वज फडकावुन साजरा करण्यात आला. यावेळी संजय सातव, बारामती स्काऊट गाईड संस्थेचे सचिव तात्यासाहेब माने, संस्थेच्या उपाध्यक्षा रेश्मा गावडे, सचिव मानसिंग आटोळे, उपसचिव अल्का आटोळे, मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com