मी विजय मल्ल्या नाही; पैसे परत करणार : डीएसके

Marathi news Pune news DSK D S Kulkarni press conference in Pune
Marathi news Pune news DSK D S Kulkarni press conference in Pune

पुणे: ''मी सर्व ठेवीदारांचे पैसे परत करणार आहे. शिवाय मी विजय मल्ल्याप्रमाणे कोणाचे पैसे घेऊन फरार झालेला नाही. मी कोणालाही फसवलेला नाही. फसवणं वेगळं आणि वेळेत पैसे परत न करणं वेगळं. त्यामुळे थोडा मला वेळ द्या. मी पैशांची व्यवस्था करतो आहे. सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत देईन,'' असे आश्वासन बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले.

विविध शहरांमध्ये आलेल्या गुंतवणूकदारांच्या तक्रारीनंतर प्रथमच डीएसकेंनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. मीडियामध्ये सध्या नकारात्मक बातम्या पसरत आहेत. म्हणजे डीएसके आणि कुटुंबातील माणसे फरार झाली. मात्र पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह हजेरी लावली आहे. 

डीएसके म्हणाले, '' आज संपूर्ण कुटुंब इथे उपस्थित आहे. तुम्ही मला प्रश्न विचारा. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहे. मला माझ्या गुंतवणूकदारांना दिलासा द्यायचा आहे. आम्ही कोणाचीही पैसा बुडवणार नाही, आम्ही सर्वांचे पैसे परत करणार आहोत. मी खूप कष्टातून दिवस काढले आहे. आजपर्यंत माझ्याविरोधात एकही तक्रार नव्हती. माझं आयुष्य धुतल्या तांदळासारखं आहे.'' 

ई सकाळवरील इतर ताज्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com