सासवड: 'निर्माल्या'च्या सेंद्रिय खताचे शेतकऱयांना वितरण

saswad
saswad

सासवड (ता.पुरंदर) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सासवड (ता. पुरंदर) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघिरे महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या संयक्त विद्यमाने जून २०१७ पासून `निर्माल्यातून सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्प` राबविण्यात आला होता. त्यातून सेंद्रिय खताची निर्मिती सुरु झाली असून या खताचे वितरण विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते तालुक्यातील स्थानिक शेतकऱयांसाठी एका कार्यक्रमात झाले.

सासवडला महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्यासह पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. सतीश बोंगाणे, प्रा. डी. एस. कदम, प्रा. एस. व्ही. ढगे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी डॉ. किशोर लिपारे, इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. 

यावेळी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी यावेळी उपक्रम व खत प्रकल्पाची माहिती दिली. दिनांक २० व २१ जून २०१७ रोजी संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी सासवड शहरातील पालखी तळावर मुक्कामी होती. या काळात भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर फुले, हार व पूजासाहित्य पालखी स्थळी वाहण्यात आले होते. यावेळी वाघिरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने सासवड नगरपरिषदेतील स्वच्छता विभागाच्या सहकार्याने या मोठ्या प्रमाणावर जमा झालेल्या या निर्माल्याचे एकत्रीकरण करून त्यावर आवश्यक त्या प्रक्रिया करून त्याचे सेंद्रिय खतामध्ये रुपांतर करण्याचा अभिनव उपक्रम राबवला होता. महाविद्यालय परीसरातील ओला कचराही त्यात  सामवला. नैसर्गिकरित्या हे निर्माल्य कुजवण्यासाठी तसा अवधी बराच लागतो. त्यामुळे अवशेष कुजविण्याची क्रीया वेगाने होण्यासाठी सुक्ष्मजीवांचा वापर करता येतो. डिंकपोस्टिंग कल्चर वापरले तर ही खत निर्मिती जलद होते. त्यातून जे खत निर्माण झाले., त्यातील सुमारे १५० किलो सेंद्रिय खताचे यावेळी विविध शेतकऱयांना कुलगुरुंच्या हस्ते वाटप केले. यावेळी कुलगुरू डॉ. करमळकर यांनी वाघिरे महाविद्यालयाने राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले व महाविद्यालयाने या अभिनव उपक्रमातून एक नवीन आदर्श निर्माण केल्याचेही ते म्हणाले. यावेळी अॅड. देशमुख म्हणाले., वाघिरे महाविद्यालय हे पुरंदर तालुक्यातील एक नामांकित महाविद्यालय असून महाविद्यालयामार्फत असे अनेक समाजोपयोगी उप्रकम आयोजित केले जातात. त्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग महत्वाची भूमिका बजावतो. कार्यक्रमाचे आयोजनात प्रा. समीर कुंभारकर, प्रा. ज्ञानेश्वर जगदाळे यांचेही सहकार्य लाभले. सूत्रसंचालन डॉ. किशोर लिपारे यांनी केले, तर आभार डॉ. सतीश बोंगाणे यांनी मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com