माघी गणेश जयंतीनिमित्त लेण्याद्रीला भाविकांची गर्दी

Lenyadri
Lenyadri

जुन्नर : अष्टविनायक गणपतींपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री येथील श्री गिरिजात्मज गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आज (रविवार) गणेश जयंतीनिमित्त भाविकांनी पहाटे पासून गर्दी केली होती. लेण्याद्री परिसरास दरवर्षी गणेश जयंतीनिमित्त भव्य यात्रा भरते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर व व्यवस्थापक  निलेश सरजिने यांनी दिली.

गणेश जयंतीच्या औचित्याने देवस्थानच्या वतीने  दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. पहाटे 5.०० वाजता श्री गिरिजात्मजास महाअभिषेक करण्यात आला. दुपारी 12 वाजता ह.भ.प. नामदेव महाराज वाळके यांचे श्री जन्माचे कीर्तन पार पडले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष श्री. गोविंद मेहेर, उपाध्यक्ष श्री. कैलास लोखंडे, सेक्रेटरी श्री. शंकर ताम्हाणे, खजिनदार सदाशिव ताम्हाणे, विश्वस्त प्रभाकर जाधव, प्रभाकर गडदे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, नंदकुमार बिडवई, मच्छिंद्र शेटे, सुरेश वाणी, जितेंद्र बिडवई, संजय ढेकणे तसेच कर्मचारी व भाविक उपस्थित होते. दिवसभर पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक तसेच जुन्नर परिसरातून श्री गणेशाच्या दर्शनासाठी भाविक येत होते. मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते.

गणेश जयंतीनिमित्त देवस्थानच्या वतीने भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात 25 हुन अधिक भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता. तसेच दि.15 पासून प्रारंभ झालेला अखंड हरिनाम सप्ताह उद्या दि. 22 रोजी आरंभ होत असून काल्याचे कीर्तन ह.भ.प. सुदाम महाराज बनकर यांचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com