जुनी सांगवीतील संत सावता माळी उद्यानाचे पालटतेय रूप

garden
garden

जुनी सांगवी : जुनी सांगवी नवी सांगवी परिसराच्या मध्यावर असलेल्या पी. डब्ल्यु. डी. मैदानाशेजारील संत सावता माळी उद्यानाची स्वच्छता डागडुजी व सुशोभिकरण स्थापत्य विभागाकडुन करण्यात येत आहे.उद्यानाच्या प्रवेश द्वारा अंतर्गत भागातील जुन्या फरशा काढण्यात येवुन त्या जागी नविन फरशा बसवण्यात येत आहेत.

नुकतेच जेष्ठ नागरीकांच्या मागणीनुसार येथे मेघडंबरीच्या आकाराचे गजिबो (डोम)छत्री बसविण्यात आली आहे.यामुळे उद्यानाच्या सौंदर्यात भर पडली आहे. आधी या जागी पाण्याचे कारंजे होते मात्र ते सतत नादुरूस्त व मोडकळीस आल्याने त्या जागी मेघडंबरीच्या आकाराची छत्री बसविण्यात आलीआहे. सकाळी व्यायामासाठी उद्यानात आलेल्या नागरीकांसाठी हे विसावा केंद्र दिलासादायक ठरणार आहे. नुकतेच याचे उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले.

या बाबत नगरसेविका शारदा सोनवणे म्हणाल्या,संत सावतामाळी उद्यानात सकाळी फिरायला येणा-या नागरीकांनी विश्रांतीसाठी येथे अशी छत्री बसवण्याची कल्पना सुचवली होती. त्यानुसार सर्वानुमते संत सावता माळी उद्यानात मा. आ.लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गजिबो बसविण्यात आला. यावेळी  माई ढोरे, नवनाथ जगताप,हर्षल ढोरे,संतोष कांबळे, शारदा सोनवणे, भाई सोनवणे,कुमार ढोरे आदी उपस्थित होते.फोटो ओळ-जुनी सांगवी: पी.डब्ल्यु.डी.मैदान संतसावता माळी उद्यानात बसविण्यात आलेली मेघडंबरीच्या आकारातील छत्रीमुळे उद्यानाच्या सौंदर्यात भर पडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com