marathi news pune news gold medal rohit chvhan
marathi news pune news gold medal rohit chvhan

रोहित चव्हाणला भालाफेकमध्ये सुवर्णपदक

वालचंदनगर - कळंब (ता.इंदापूर) येथील रोहित भारत चव्हाण याने राज्यस्तरीय भालाफेक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले असून त्याची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

धुळे येथे नुकत्याच युवा खेल कुद असोशिएशनने वतीने राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. स्पर्धेत कळंब येथील रोहितने चव्हाणने  74.13 मीटर  लांब भालाफेक करून सुर्वणपदक पटकावले. चव्हाण याची राष्ट्रीय पातळीवरील भालाफेक स्पर्धेसाठी निवड झाली अाहे. राष्ट्रीय स्पर्धा जम्मू-काश्मीर मध्ये होणार आहे. रोहित चव्हाण हा सर्वसामान्य कुंटूबातील युवक असून त्याचे महाविद्यालयीन शिक्षण कळंब येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात पूर्ण झाले असून सध्या तो मुंबईमध्ये भालाफेकचा सराव व अग्निीशामक दलामध्ये प्रशिक्षण घेत आहे. महाविद्यालयाचे वीरसिंह रणसिंग, प्राचार्य डॉ. अंकुश आहेर, उपप्राचार्य डॉ. बबन भापकर यांनी अभिनंदन केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com