बारामती तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 113 अर्ज

Gram Panchayat
Gram Panchayat

शिर्सुफळ : बारामती तालुक्यातील जानेवारी ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या सोळा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी 113 अर्ज तर 172 सदस्यांच्यासाठी 720 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार हनुमंत पाटील यांनी दिली. यामध्ये सायंबाचीवाडी ग्रामपंचायतीच्या 7 जागांसाठी सातच अर्ज दाखल झाले आहेत. यामुळे सदस्य बिनविरोध निवडीची औपचारिक घोषणा बाकी असली तरी सरपंच पदासाठी दोन अर्ज दाखल झाले आहेत. असेअसले तरी ग्रामपंचायतीसाठी गुरुवार (ता.14) रोजी अर्ज माघारीचा दिवस असुन त्यानंतरच प्रत्येक गावातील निवडणुकींचे चित्र स्पष्ट होणार आहे.

बारामती तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीमध्ये अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 16 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी 46 व या गावांमधील 172 सदस्यांच्या निवडणुकीसाठी 289 अर्ज दाखल झाले आहेत. यामुळे आज दिवसभर तहसिल कार्यालयाला जत्रेच स्वरुप आले होते. या निवडणुकीमध्ये संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असलेल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावामध्ये सरपंच पदाच्यासाठी 12 तर सदस्यांच्या 15 जागांसाठी तब्बल 103 अर्ज दाखल झाले आहेत. तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांच्या पारवडी गावामध्ये सरपंच पदाच्या जागेसाठी 11 तर सदस्यांच्या 13 जागांसाठी 67 अर्ज दाखल झाले आहेत. असे असले तरी संपूर्ण निवडणुकीचे चित्र गुरुवार (ता.14) रोजी अर्ज माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे.

बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतीचे नाव, सरपंच पदासाठी आलेले अर्ज संख्या, तर कंसात सदस्य संख्या व त्यासाठी दाखल झालेले अर्ज संख्याखालील प्रमाणे..
1) काटेवाडी - 12 - (15 - 103) 
2) डोर्लेवाडी - 7 - (15 - 87)
3) पारवडी - 11 - (13 - 67)
4) कऱ्हावागज - 7 - (11 - 41)  
5) धुमाळवाडी - 3 - (9 - 33)
6) करंजेपुल - 5 - (11 - 22)
7) आंबी ब्रु. - 7  - (7 - 33)
8) गुणवडी - 5 - (17 - 84)
9) गाडीखेल - 11 - (7 - 21)
10) पवईमाळ - 9 - (9 - 36)
11) मान्नापावाडी - 4 - (11 - 52) 
12) सि. निंबोडी - 5 - (9 - 27)
13) मुढाळे - 12 - (13 - 49)
14) चौधरवाडी - 8 - (7 - 10)
15) सायंबाचीवाडी - 2 - (7 - 7)
16) मेडद - 5 - (11 - 48)
एकुण - 113 - (172 - 720)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com