'अरे या चीनचं करायचं काय.. खाली डोकं अन् वरती पाय..!' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

पुणे : 'अरे या चीनचं करायचं काय.. खाली डोकं, वर पाय!' अशा घोषणा देत राष्ट्रीय हिंदू आंदोलन व हिंदू जनजागृतीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील नवी सांगवी येथील साई चौकाचा परिसर दणाणून सोडला. चीनला धडा शिकविण्यासाठी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. 

'गेल्या काही दिवसांपासून सीमेवर घुसखोरी करू पाहणाऱ्या चिनी सैनिकांची मुजोरी वाढत असताना भारतीय बाजारपेठांमध्येही चिनी वस्तूंची मोठी चलती आहे. त्यामुळे या वस्तूंवर बहिष्कार घालणे आवश्‍यक आहे' अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. 

गेल्या काही वर्षांपासून हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते आणि कार्यकर्त्यांवर होणारे प्राणघातक हल्ले पाहता त्यांना संरक्षण देण्याची मागणीही या आंदोलनात करण्यात आली. एका मल्याळी चित्रपटातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचा दावा करत या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणीही आंदोलकांनी केली.