ज्वेलर्सच्या दुकानात चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीस अटक

arrest
arrest

लोणी काळभोर : ज्वेलर्सच्या दुकानासमोर आपापसांत भांडणाचे नाटक करून दुकानातील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या परप्रांतिय महिलांच्या टोळीचे कारनामे उघडकीस आणण्यात पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. पोलिसांनी काल (मंगळवार) रात्री चाकण परिसरातून एका अल्पवयीन मुलीसह चार महिलांना लोणी काळभोर येथील एका दुकानातून चोरलेल्या मुद्देमालासह अटक केली आहे. याशिवाय, त्यांच्या टोळीबरोबर काम करणाऱ्या तीन महिलांनाही चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिली. 

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेश मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली. चाकण परिसरातून पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीसह चौघींना अटक केली आहे. लोणी काळभोरमधील दुकानात चोरी केल्याची कबुली या महिलांनी दिली आहे. तसेच, त्या दुकानातून चोरलेल्या मालापैकी चांदीचे एक किलो 80 ग्रॅम वजनाचे दागिने विकून आलेली सव्वा लाख रुपयांची रोख रक्कमही त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. या महिलांकडून 13 मोबाईल, दोन घड्याळे आणि एक कॅमेराही सापडला आहे. या सर्व आरोपींना लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर हद्दीतील कदम वस्ती परिसरातील हितेश रावळ यांच्या ज्वेलर्सच्या दुकानात चार फेब्रुवारी रोजी दुपारी बाराच्या सुमारास चार अनोळखी महिला आणि दोन लहान मुलांनी भीक मागण्याच्या बहाण्याने दुकानात येऊन आपापसांत भांडण करण्यास सुरवात केली. भांडण सोडविण्याच्या हेतूने दुकानातील नोकर काऊंटरबाहेर आल्याची संधी साधत त्यांच्यापैकी एकीने काऊंटरच्या मागे जाऊन खाली ठेवलेल्या बॅगेतील सोन्याचे 48 तोळे दागिने आणि चांदीचे 1 किलो 50 ग्रॅम दागिने असा साडेबारा लाख रुपये किंमतीचा माल लंपास केला होता. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. 

याबाबतची तक्रार मिळताच पोलिस अधीक्षक सुवेज हक यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिकग गुन्हे अन्वेषण शाखेला करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, पोलिस उपनिरीक्षक महेश मुंडे, दत्तात्रय गिरमकर, महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष घारे, पोपट गायकवाड, राजू मोमीन यांनी सीसीटीव्ही फुटेजमधील महिलांच्या वर्णनाशी मिळत्याजुळत्या महिलांची माहिती गोळा करण्यास सुरवात केली होती. 

दरम्यान लोणी काळभोर येथील घटनेशी मिळत्याजुळत्या वर्णनाच्या महिला या चाकण परिसरात भिक मागताना पाहिल्याची माहिती एका खबऱ्याने महेश मुढे यांना दिली. यावर मुढे व त्यांच्या सहकाऱ्यांनी साध्या वेशात चाकण परिसरात जावून त्यांचे राहणेचे ठिकाणची माहिती काढून चाकण पोलीस स्टाफचे मदतीने संशयितरित्या फिरणाऱ्या वरील सातही जनांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. यात अनिता पवार, सुनिता पवार, बालीका पवार व त्यांच्या समवेतच्या अप्लवयीन मुलीने कदमवाकवस्ती मधील केलेल्या चोरीची कबुली दिली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सहा महिला व एक पुरुष हे गुजरात मधील असुन, सातहीजण अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली आहे. अनिता पवार व त्यांच्या सहकाऱ्यांच्याकडे तेरा मोबाईल फोन आढळुन आले असुन, त्यांच्याकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत पुणे शहर व ग्रामिण पोलिसांच्या हद्दीतील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले यांनी व्यक्त केली आहे. 

महिलांना अटक करताच, पोलिसांच्यावर दुहेरी जबाबदारी... 

स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेने या तिघींना लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देऊन तासाभराचा कालावधी उलटण्यापुर्वीच, त्यातील एका महिलेस प्रसुती कळा सुरु झाल्या. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, तिला पुण्यातील शासकीय रुग्नालयात हलविले. रुग्नालयात बालिकाची प्रसुती झाली असुन, तीला मुलगा झाला आहे. त्या महिलेस  यापुर्वीच्या तीन मुली आहेत. तर अटक केलेली दुसरी एक महिलाही सहा महिन्यांची गरोदर आहे. लोणी काळभोर पोलिसांनी वरील दोघींनीही न्यायालयीन कोठडीची मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com