मोहोळ काढल्याने विद्यार्थ्यांनी सोडला सुस्कारा

junnar
junnar

जुन्नर (पुणे) : जुन्नर नगर पालिकेच्या पाण्याच्या टाकीखाली असणारे आग्या मधमाशांचे मोहोळ गुरुवारी (ता.8) रात्री काढून टाकल्याने आज शुक्रवारी (ता.9) सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांनी तर नंतर दहावीचा पेपर देण्यासाठी आलेल्या परिक्षार्थींनी तसेच शिक्षक व पालकांनी सुस्कारा सोडला.

शाळेतून घरी जाण्यासाठी खासगी वाहनाजवळ थांबलेल्या शाळकरी बालकांवर आग्या मोहळातील माशांनी केलेल्या हल्ल्यात बावीस विद्यार्थी जखमी झाले होते. यातील आठ जणांना अधिक प्रमाणात दंश झाला असल्याने त्यांना बालरोगतज्ञाच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात आले सर्व जखमीची प्रकृती चांगली झाल्याने त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असल्याचे शाळेतून  सांगण्यात आले.

सकाळी ही घटना झाल्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पुन्हा माशा घोंगाऊ लागल्याने दहावीचे पेपर सोडवत असलेल्या मुलांना त्रास होऊ नये म्हणून दरवाजे खिडक्या बंद कराव्या लागल्या पेपर नंतर दुसऱ्या मार्गाने त्यांना घरी पाठविण्यात आले होते. येथे असणारे मोहोळ अनेकदा उठल्याने अशा घटना यापूर्वी अनेकदा घडल्या असल्याने नगर पालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी नागरिकांनी मागणी केली होती त्याकडे त्वरित लक्ष घालून नगराध्यक्ष शाम पांडे यांनी कर्मचाऱ्यांना मोहोळ काढणे बाबत सूचना केल्या त्यानुसार पाणीपुरवठा विभाग प्रमुख बाळासाहेब भोसले यांनी खासगी तरुणांच्या मदतीने सुमारे 80 फुट उंचीवरील मोहोळ रात्री परिसरातील वीज पुरवठा बंद करून अंधारात काढून टाकले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com