कोंढवे- धावडे ग्रामस्थांनी शोधला बिनविरोध निवडीचा फॉर्म्युला 

pune
pune

कोंढवे धावडे : गावातील सरपंच थेट जनतेतून निवडून येणार असल्याने ग्रामपंचायत सदस्याचे जास्त महत्व राहिले नाही परंतू तरी देखील सरपंचपद सोडून कोंढवे- धावडे ग्रामपंचायतीच्या 17 जागासाठी सुमारे ९०जण इच्छुक होते. गावातील जुन्या जाणत्या अस्सल राजकारणी व्यक्तींनी सर्व इच्छुकांना तीन तीन महिने वाटून द्यायचे. असा फॉर्म्युला शोधला आणि पाहता पाहता तो सहा वॉर्डातील 17 जागांवर यशस्वी झाला.

पूर्वी सर्व सदस्य निवडून आल्यानंतर त्यातून जास्त सदस्यांचे बहुमत मिळविणारा सरपंच होत असे. त्यावेळी प्रत्येक सदस्याला महत्व होते. त्या एक- एक सदस्य निवडून आणण्यासाठी मोठी उलथापालथ होत असे. परंतु निवडणुक कायद्यातील नवीन बदलामुळे सरपंच पद थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्यामुळे सदस्य पदाला महत्त्व कमी झाले आहे. बहुमत होणार नसल्याने सदस्य नामधारी झाले आहेत. परंतु तरी देखील 17 जागेसाठी सुमारे ९०जण इच्छुक होते. त्यासाठी गावातील सर्व जुने जाणते स्थानिक तरुण नागरिक व इच्छुक गावातील भैरवनाथ मंदिरासमोर जमा झाले. जुन्या माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, पॅनल प्रमुख, विविध भावकीचे प्रमुख, विविध पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

सहा महिन्यापूर्वी निवडणूकिसाठी अर्ज भरलेल्या इच्छुकांची यादी होती. त्यानुसार, सर्वांना सांगण्यात आले की, तुमच्यातुन एक जण निवडून येईल. इतरांना पद मिळणार नाही मतदार राजा कोणाला निवडून देणार ते माहिती नाही. अधिकृत अनधिकृत किती खर्च होईल हे सांगता येणार नाही. मग आम्ही सगळ्यांचा खर्च वाचवितो. सगळ्यांना तीन किंवा सहा महिने सदस्य होण्याची संधी देतो. त्यावर चर्चा झाली. त्यास उपस्थित सगळ्यांनी मान्यता दिली. 

यातून 70 जणांची निवड समिती केली. यातुन 10 जण मुख्य होते. त्यांनी पुन्हा या 70 जणांची वार्ड निहाय समिती केली. त्यानुसार, त्यातील प्रत्येक जागेच्या इच्छुकांची यादी केली. त्यांचा निवडून येण्याचा क्रम ठरविण्याची जबाबदारी या स्थानिक कमिटीला दिला. 

इच्छुकांच्या संख्येनुसार म्हणजे इच्छुक जास्त असलेल्या वॉर्डात तीन महिने आणि कमी इच्छुक असलेल्या वॉर्डात सहा महिने सदस्य पद मिळेल. सर्वांनी एकत्रित येऊन हा निर्णय घेतला. यात काही जागेसाठी पाच वर्षात आठ ते नऊ वेळा सदस्य पदाची निवडणूक होणार आहे. 

पहिल्या टप्प्यातील बिनविरोध आलेले निवडून आलेले सदस्य आहेत. 
बिनविरोध ग्रामपंचयत पंचायत सदस्य
वॉर्ड क्र 1

रेश्मा अनिल धावडे
सिंधु बाळासाहेब धावडे
बजरंग सोपान धावडे
वॉर्ड क्र 2
सूचिता सूर्यकांत गायकवाड
संगिता दत्ता ढाकुळकर
सुनित प्रदिप लिंबोरे
वॉर्ड क्र 3
अविनाश बन्सी सरोदे
राजू बाबू राठोड
कल्पना गोरख मोकाशी
वॉर्ड क्र 4
मयुरी विनोद तावरे
शोभा माणिक मोकाशी 
धनंजय वसंत मोकाशी
वॉर्ड क्र 5
महेश शरद बारटक्के
सोनिया सागर धावडे
समिर उत्तम दामगुडे
वॉर्ड क्र 6
स्नेहल अमोल धावडे
नवनाथ बबनराव धावडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com