कृषी वैभव 2018' या कृषी प्रदर्शनाची सांगता

कृषी वैभव 2018' या कृषी प्रदर्शनाची सांगता

उरुळी कांचन (पुणे) : पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती यांच्या सहकार्याने उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डॉ. माणिभाई देसाई कृषी विकास प्रतिष्ठाण आयोजित 'कृषी वैभव २०१८' या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाची नुकतीच सांगता झाली. यामध्ये सहभागी पशु-पक्षांचे परीक्षण करून त्यांची क्रमवारी ठरविण्यात आली. यामध्ये प्रत्येक गटातील पहिल्या तीन उत्कृष्ठ पशु-पक्षांना बक्षिसे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद यांच्या हस्ते देण्यात आली. निवड झालेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या पशूंच्या मालकांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपये रोख, सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 

पशु-पक्षी प्रदर्शनातील गट व निवड झालेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या पशु-पक्षांच्या मालकांची नावे पुढीलप्रमाणे : 

गट - खिलार कालवड -
धीरज रामचंद्र गायकवाड (रा. कटगुण, ता. जि. सातारा), फरीदाभाई जाफरभाई इनामदार (रा. कळंबीखटाव, ता. खटाव, जि. सातारा), जावेद दिलावर मुलाणी (रा. गदेगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर).

गट - खिलार गाई -
सौदागर जालिंदर शिंदे (रा. काळाशी, ता. इंदापूर), सचिन तुकाराम कोकाटे (रा. बावडा, ता. इंदापूर), धनाजी धर्मा चौघुले (रा. नांदगाव, ता. मोहळ, जि - सोलापूर).

गट - म्हैसूर बैल -
चंद्रकांत बबन साकोरे (रा. फुलगाव, ता. हवेली), साईराज दिलीप कोतवाल (रा. अष्टापुर, ता. हवेली).

गट - खिलार बैल -
सोपान बाबू ठोंबरे (रा. मळद, ता. सांगोला, जि. सोलापूर), बिभीषन प्रकाश बोरवाने (रा.पळसदेव, ता. इंदापूर), राजरदत्त रविंद्र गायकवाड (रा. अकोले, ता. म्हाडा, जि. सोलापूर).

गट - खिलार बैल जुळूक - 
बलभीम बापूराव गायकवाड (रा. आकडेम्हाडा, ता. म्हाडा, जि. सोलापूर), शंकर विठोबा जमदाडे (रा. चिलाईवाडी, जि. सोलापूर), राजू बाबुराव कदम (रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर).

गट - खिलार - 
सतीश भिमराव शिंदे (रा. बावडा, ता.इंदापूर), भारत किसन जमदाडे (रा. भोसे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर), राजू किसन चंद (रा. फुरसुंगी, ता. हवेली).

गट - वराह - 
मिलिंद ज्ञानोबा गारुडकर (रा. दहीटणे, ता. दौंड)

गट - देवणी - 
सत्यभामा केरबा शिंदे (रा. तळणी, ता. रेणूपुर, जि. लातूर), जनार्दन रघुनाथ चव्हाण (रा.धायरी, ता. इंदापूर), नामदेव पिराजी भालेराव (रा. पालभ, ता. जि. परभणी).

गट - संकरित गायी - 
जनार्दन पांडुरंग कामठे (रा. शिंदवणे, ता. हवेली), किसन बाळासाहेब शिवले (रा. तुळापूर, ता. हवेली), भिमराव यशवंत येळेकर (रा. खामगाव टेक, ता. हवेली)

गट - गिर गायी -
शारदा गणपत कड (रा. शिंदवणे, ता. हवेली), महेंद्र चंपालाल कुंकलोळ (रा. हिंगणगाव, ता. हवेली).

गट - म्हैस -
गोरख नारायण वागजकर (रा. फुलगाव, ता. हवेली), भिमराव यशवंत टिळेकर (रा. खामगाव टेक), सागर हिरामण खलसे (रा. उरुळी कांचन).

गट - अश्व (घोडा) -
निलेश मच्छिन्द्र ढोरे (रा. केसनंद, ता. हवेली), आनंदा बापू खुटवड (रा. फुरसुंगी, ता. हवेली), बाळासाहेब गणपत साकोरे (रा. फुलगाव, ता. हवेली).

गट - शेळी मेंढी -
विजय लक्ष्मण जेडगे (रा. कालठण, ता. इंदापूर), शिवाजी सदाशिव हरपळे (रा. फुरसुंगी, ता. हवेली), सलमान इब्राहिम मुलाणी (रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली).

गट - कुक्कुट -
शिवाजी सदाशिव हरपळे (रा. फुरसुंगी, ता. हवेली), विष्णू नारायण गोळे (रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली), विजय शिवाजी शिंदे (रा. कोरेगाव मूळ, ता. हवेली).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com