भक्षाच्या शोधातील बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

Leopard
Leopard

जुन्नर : पिंपरी पेंढार ता.जुन्नर गावच्या हद्दीत कोबंडवाडी शिवारात कॅनल जवळील विहीरीत भक्षाच्या शोधातील बिबट्या पडला त्यास आज मंगळवारी दुपारी वनविभागाने  सुखरुप पणे पिंजऱ्यात जेरबंद करुन विहीरीतून बाहेर काढले असल्याची माहिती ओतूर वनविभागाचे वनक्षेत्रपाल एस.एस.रघतवान यानी दिली.

सदर बिबट्या नर जातीचा असून अंदाजे पाच ते सहा वर्ष वयाचा आहे. पिंपरीपेंढार येथील संभाजी तपासे यांच्या विहीरीत बिबट्या पडल्याची माहीती वनविभागाला येथील सामाजिक कार्यकर्ते किरण कुटे यानी दिली. त्यानंतर वनक्षेत्रपाल सचिन रघतवाना यांच्या मार्गदर्शनाखाली माणिकडोह बिबट निवारण केंद्रातील डॉ. महेंद्र ढोरे, धोंडिबा कोकणे, ज्ञानेश्वर सांळुके, एस.बी.महाले, एम.बी.फुलसुंदर, व्हि.टी.विभुते, ऐ.डी.तंगडवाड, व्हि.आर.अडागळे, एस.जी.मोमीन, एस.ऐ.राठोड, जे.बी.सानप, बी.के.खर्गे, एस.बी.गायकर, जे.एम.वायाळ इत्यादीच्या पथकाने विहीरीत पडलेला बिबट्याला विहीरीत पिंजरा सोडुन जेरबंद केले.

विहीरीत पडलेला बिबट्या पाहण्यासाठी ग्रामस्थानी विहीरीच्या परिसरात मोठी गर्दी केली होती. पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद केल्यानंतर त्यास माणिकडोह बिबट निवारण केंद्रात दाखल करण्यात आल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com