निकिता टकले मारुती सुझुकी ऑटो प्रिक्स सिझन-वनची मानकरी

कृष्णकांत कोबल
बुधवार, 31 जानेवारी 2018

मांजरी : मारुती सुझुकी ऑटो प्रिक्स सिझन-वन स्पर्धेत येथील निकिता नितीन टकले या 17 वर्षाच्या विद्यार्थिनीने प्रथम  क्रमांक मिळविला. कोंढवा येथील मैदानावर नुकत्याच पार पडलेल्या ऑटो कार रेसिंग विश्वातील या नावाजलेल्या स्पर्धेत निकिता पहिल्यांदाच सहभागी झाली होती. स्पर्धेमध्ये सुमारे शंभर अनुभवी खेळाडू सहभागी झाले होते. वडील नितीन टकले व चुलते प्रसिद्ध कार रेसिंगपटू संजय टकले यांचे मार्गदर्शन पाठीशी असल्याने तिने या चुरशीच्या स्पर्धेत यश मिळवले. तिचीच चुलत बहीण संजना टकले हिनेही या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला आहे.

पहिल्या दिवशी निकीताने दोन राउंडमध्ये सहभागी होत पहिला क्रमांक मिळवला. दुसऱ्या दिवशी पहिल्याच राउंडमध्ये तिच्या कारला अपघात होऊन ती जखमी झाली आणि तिला दुसऱ्या राउंडमध्ये बाहेर पडावे लागले. तरीही नाउमेद न होता निकिता तिसऱ्या दिवशी फायनल राउंडमध्ये सहभागी झाली व आपले सर्व कौशल्य पणाला लावून तीने ही स्पर्धा जिंकली. दिल्ली येथेही 23 फेब्रुवारीला राष्ट्रीय स्तरावरील मारुती सुझुकी ऑटो प्रिक्स स्पर्धा होणार आहे. त्यामध्येही निकिता सहभागी होणार असून सध्या ती त्याची तयारी करत आहे. निकिता सध्या 12वी वाणिज्य शाखेत शिक्षण घेत आहे. वडील नितीन टकले माजी फुटबॉल पटू आहेत. तर चुलते संजय टकले यांनी विविध देशांमध्ये कार रेसिंग स्पर्धा गाजवल्या आहेत. 

Web Title: Marathi news pune news nikita takle wins maruti suzuki auto prix season