मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महापालिकेतर्फे शिष्यवृत्ती 

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महापालिकेतर्फे शिष्यवृत्ती 

पुणे - शहरातील पाच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रत्येकी दोन लाख रुपये शिष्यवृत्ती देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी मंजूर करण्यात आला. महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या मागासवर्गीय कल्याणकारी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे, असे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर दुष्काळग्रस्त भागातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत म्हणून काही निधी देण्यात यावा, आर्थिक दुर्बल घटकातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी प्रत्येकी दोन लाख रुपये शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या मागासवर्गीय कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून दरवर्षी आर्थिक तरतूद केली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com