ट्रकचालकास लुटणाऱ्या टोळीला पकडले 

ट्रकचालकास लुटणाऱ्या टोळीला पकडले 

तळेगाव स्टेशन : तळेगाव-चाकण महामार्गावर इंदोरीनजीक दहा दिवसांपूर्वी ट्रकचालकाला मारहाण करून ट्रकसह जवळपास 50 लाखांचा मुद्देमाल चोरून विकणाऱ्या सात जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पुण्यातून अटक केली. त्यांना तळेगाव एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

7 फेब्रुवारीला रात्री साडेआठच्या दरम्यान तळेगाव-चाकण महामार्गावर इंदोरी ते भंडारा डोंगर पायथादरम्यान ट्रकचालक ऍलॉय शिसे लीडचे बंडल मरकळ (ता. खेड, पुणे) येथील क्‍लोराईड मेटल लिमिटेड कंपनीकडे घेऊन जात होता. तेव्हा सहा जणांनी मोटारसायकली आडव्या घालून ट्रक अडविला. चालकास हाताने मारहाण केली. गुंगीचे औषध तोंडाला लावून बेशुद्ध करून हातपाय बांधले व ट्रकसह माल, तसेच लावा कंपनीचा मोबाईल, रोख रक्कम चोरून नेला होता. याप्रकरणी चालक अमरनाथ यादव(चिखली, पुणे) याने दुसऱ्या दिवशी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. 

एमआयडीसी पोलिस आणि एलसीबीने तपास केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने आणि सहकाऱ्यांच्या पथकाने गोपनीय माहिती काढली. पुणे परिसरातून संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पथकाने शुक्रवारी (ता.16) संदीप दादासाहेब झिरपे (वय 25, तळणी, ता. शेवगाव, जिल्हा अहमदनगर), नागेश अंकुश महाडिक (वय 25), अनिल भाऊसाहेब इंगवले (वय 20, रा. सांगोला, जि. सोलापूर), अमरनाथ भैरुदेव बाबर (वय 25, चिक मोहदक, ता. सांगोला, जि. सोलापूर), सागर राजू माने (वय 24, शिवतेजनगर, केपीआयटी कंपनी शेजारी, हिंजवडी, पुणे) आणि समर्थ सतीश शिंदे (वय 22, लक्ष्मी चौक, बुचडे वस्ती, हिंजवडी, पुणे) यांच्यासह हा चोरीचा माल विकत घेणारा मुशाहीद जावेद खान (वय 23, गांधीनगर, भाऊ पाटील रोड, बोपोडी, पुणे) यांना अटक केली. त्यांनी चोरलेला 960 नगाची (24 बंडल) किंमत 48,91,701/- आणि ट्रक असा जवळपास 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी झिरपे याचेविरुद्ध कोथरूड आणि शेवगाव (जि. अहमदनगर) येथील ठाण्यात विविध गुन्हे, तर माने याच्याविरुद्ध हिंजवडी ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पथकाने आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी तळेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.

शनिवारी (ता. 17) वडगाव न्यायालयाने त्यांना 22 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सहायक पोलिस निरीक्षक साधना पाटील यांच्यासह उपनिरीक्षक अरविंद हिंगोले तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com