सीसीटीव्हीमुळे दीडशे गुन्हेगार जेरबंद 

सीसीटीव्हीमुळे दीडशे गुन्हेगार जेरबंद 

पुणे : शहरात वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांसोबतच गुन्हेगारांवरही सीसीटीव्हीची करडी नजर आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने घरफोडी, सोनसाखळी चोरीसह 109 गुन्हे उघडकीस आणत 140 हून अधिक आरोपींना अटक केली आहे. तसेच, साडेचार लाखांहून अधिक बेशिस्त वाहनचालकांना सुमारे 11 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

पुणे शहरात सन 2015 मध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. पोलिस आयुक्‍तालयाच्या हद्दीत एक हजार 298 सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. मुख्य सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष पोलिस आयुक्‍तालयात असून, पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून संशयितांवर वॉच ठेवण्यात येत आहे. तसेच, वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षातूनही सीसीटीव्हीद्वारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे.

गुन्हे उघडकीस आणण्यात सीसीटीव्हींची मदत घेण्यात येत आहे. त्यामुळे सोनसाखळी चोरी, घरफोडी तसेच गंभीर गुन्ह्यांची उकल झाली आहे. तसेच, अपहरण आणि बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींनाही अटक केली आहे. 

  • कोंढव्यात झालेल्या एटीएम मशिन चोरीचा गुन्हा हा सीसीटीव्हीमुळे उघडकीस आला. या गुन्ह्यांत कोंढवा पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्यासाठी पावणेसहाशे सीसीटीव्ही फुटेज तपासले. 
  • बोपोडी येथे एका महिलेने तिच्या बाळाला नदीत फेकून दिले होते. महिलेने बाळाचे अपहरण केल्याचा बनाव रचला होता. परंतु, पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने हा गुन्हा उघड केला. 

सीसीटीव्हीद्वारे उघडकीस आणलेले गुन्हे 
वर्ष गुन्हे अटक आरोपी 
सन 2016 60 93 
सन 2017 109 140 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com