'प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यश निश्चित'

Baramati
Baramati

शिर्सुफळ : विद्यार्थ्यांनी मनामध्ये कसलाही न्यूनगंड निर्मान न होऊ देता.प्राप्त परिस्थितीचा आत्मविश्वासाने सामना केल्यास तसेच प्रामाणिक पणे प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते असे प्रतिपादन प्राचार्य सखाराम गावडे यांनी केले.

पारवडी (ता. बारामती) येथील भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै. जिजाबाई दादासाहेब गावडे ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांन साठी परीक्षेला सामोरे जाताना याविषयावर मार्गदर्शन प्रसंगी प्राचार्य गावडे बोलत होते. या कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. यावेळी प्रा. मेश आटोळे, प्रा. नवनाथ  काशीद, प्रा. देविदास सोनवले, प्रा. मेघना भरणे, प्रा. सुजाता धायतोंडे, प्रा. आशा वाघमोडे, एम. आर. गावडे उपस्थित होते.  

यावेळी प्राचार्य सखाराम गावडे यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करताना सांगितले की ध्येय निश्चित करून प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते.त्यासाठी यशस्वी झालेल्या व्यक्तीचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. जीवनात चांगल्या संस्कारांचे अनुकरण करावे कारण जीवन एकदाच आहे तसेच विद्यार्थ्यांनी मन एकाग्र करून परीक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन केले. व परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. 

या वेळी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणुन प्रिती पोंदकूले, संगीता पवार, मृणालिनी गावडे, सोनाली मारकड या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यानंतर परीक्षेसाठी शुभेच्छा व निरोप (सदिच्छा) समारंभ पार पडला.याप्रसंगी सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.स्वाती पवार यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com